Maharashtra Breaking News LIVE 29 April 2025 : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण? वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू

जम्मू आणि काश्मीर विधानसभेत सोमवारी पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर झाला. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अनेकदा भावूक झाले. यजमान राज्याचा मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री म्हणून पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली होती, मात्र यात कमी पडलो.. अशा शब्दांत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. हल्ल्याविरोधात काश्मिरी जनतेमध्ये उमटलेला अभूतपूर्व संताप ही दहशतवादाच्या अंताची सुरुवात असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. तर दुसरीकडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या उत्तराधिकारीपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, अर्चना त्यागी यांच्या नावांची चर्चा आहे. दाते सध्या एनआयएमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या नियुक्तीची शक्यता कमी आहे. रितेश कुमार, अमिताभ गुप्ता आणि संजीवकुमार सिंघलही शर्यतीत आहेत. तर रितेश कुमार आघाडीवर आहेत. महिला अधिकारी म्हणून अर्चना त्यागी किंवा विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचाही विचार होत असल्याची चर्चा सुरू आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)