कोमट पाणी पिणे अनेक आरोग्य फायदे देऊ शकते. ते पचनक्रिया सुधारण्यास, वजन कमी करण्यास आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. पण प्रत्येकासाठी ते फायदेशीर नाही. काही लोकांसाठी कोमट पाणी नुकसानकारक ठरू शकते. चला, जाणून घेऊया कोणत्या लोकांनी कोमट पाणी टाळावे !
1. हार्ट पेशंट : कोमट पाणी शरीरातील रक्तप्रवाह वाढवते, ज्यामुळे हृदयाची समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तदाब असंतुलन होऊ शकते. परिणामी, चक्कर येणे, थकवा किंवा अस्वस्थता होऊ शकते.
2. कमी ब्लडप्रेशर असलेली लोकं : लो ब्लडप्रेशर असलेल्या लोकांसाठी कोमट पाणी हानिकारक ठरू शकते. ते शरीराच्या रक्तदाबाला आणखी कमी करू शकते.
3. डीहाइड्रेशन किंवा अशक्तपणा असलेली लोकं : गरम पाणी पिण्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते, ज्यामुळे जास्त घाम येतो. परिणामी, डिहायड्रेशन वाढू शकते. अशा लोकांसाठी सामान्य तापमानातील पाणी अधिक योग्य आहे.
4. जास्त ताप किंवा इन्फेक्शन असलेली लोकं : ताप असलेल्या लोकांसाठी कोमट पाणी हानिकारक ठरू शकते. हे शरीराची उष्णता वाढवू शकते, ज्यामुळे ताप अधिक वाढू शकतो.
5. प्रेग्नेंट बायका : प्रेग्नेंट महिलांनी कोमट पाणी टाळले पाहिजे, विशेषत: गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या महिन्यांत. गरम पाणी शरीरातील उष्णता वाढवू शकते, ज्यामुळे गर्भाशयात असलेल्या बाळाला धोका होऊ शकतो.
6.उन्हाळ्यात : बाहेरील वातावरण खूप गरम असले तरी कोमट पाणी पिण्यामुळे शरीर अधिक तापू शकते, ज्यामुळे हिट स्ट्रोक किंवा डोकेदुखी सारखी समस्या उद्भवू शकते.
उन्हाळ्यात पाणी पिण्याचे सोपे आणि आरोग्यदायी नियम :
1. एकदम खूप सगळं पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोडं थोडं करत पाणी प्यायल्यास शरीराला पुरेशी हायड्रेशन मिळते.
2. अतिशय थंड पाणी पिल्याने घशाला त्रास होऊ शकतो, तसेच अचानक शरीरात तापमान बदल झाल्यास पचनावर वाईट परिणाम होतो.
3. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील उष्णता बाहेर जाते, अशावेळी साधं किंवा किंचित कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील तापमान बॅलन्स राहतं.