Patangrao Kadam Daughter Death : घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले तरी भारतीताई अतिशय साध्या आणि सामान्य लोकांत मिळून मिसळून असत
भारती महेंद्र लाड यांचा जन्म 18 जुलै 1972 रोजी सोनसळ (ता.कडेगांव) येथे झाला. डॉ. पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ भारतीताईंनी अतिशय जवळून पाहिला होता. त्यामुळे पुढे डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांच्याच नावे सर्व संस्थांचे जाळे उभे केले. त्यामुळे भारती संकुल आज डौलाने विद्यादानाचे काम करत आहे.
घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले तरी भारतीताई अतिशय साध्या आणि सामान्य लोकांत मिळून मिसळून असत. त्यांचा विवाह 3 मे 1993 रोजी कुंडल (ता. पलूस) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी झाला. जवळच्याच पाहुण्यांतच लग्न झाल्याने त्या इथेही लगेच रुळल्या. त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचे जाळे या परिसरात उभे राहिले आहे.
Bharati Lad : पतंगरावांची भरभराट करणाऱ्या संस्थांच्या नावामागील ‘भारती’ गेल्या; चक्कर आली, हेलिकॉप्टरने पुण्यात आणलं, पण उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
भारतीताई यांनी महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या नेहमी अग्रेसर असत. महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पद अशी जबाबदारी आल्याने गावगाडा आणि महिला सबलीकरणासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या.Nagpur Crime : माझ्या बायकोचं परपुरुषासोबत अश्लील कृत्य, ‘त्या’ साईटवर मी व्हिडिओ पाहिला, पतीची तक्रार, नागपुरात खळबळ
भारतीताई आणि महेंद्र लाड यांना ऋषिकेश आणि रोहन ही दोन मुलं. ऋषिकेश उद्योग व्यवसाय बघतात तर रोहन राजकारण आणि समाजकारणात वडिलांना हातभार लावतात.Dilip Sananda : ‘जब तक जिंदा हू, काँग्रेस का परिंदा हू’ म्हणणारा नेता शिंदेंच्या भेटीला, तीन टर्म माजी आमदाराच्या मनात काय?
भारतीताईंना 14 एप्रिल रोजी चक्कर आल्यासारखे झाले. सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी तातडीने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला. सांगलीतून हेलिकॉप्टरने पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची किडनी निकामी झाल्याचे सांगण्यात आले असताना डॉक्टरांनी अत्युच्च उपचार सुरूच ठेवले होते. परंतु शक्य ते सगळे प्रयत्न करुनही 28 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.