मुंबईवर हल्ला झाला तर मुंबईच्या लोकांवर डाग लागला नाही…पण काश्मिरात हल्ला झाला तर तेथील स्थानिकांवर डाग लावाला जात आहे. मी स्वत: माझे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काश्मिरात माझ्या घरी कायमचं राहाण्यासाठी जात आहे… हे बोल आहेत काश्मिरी तरुणाचे …ज्याने ‘रेडू’ या मराठी चित्रपटात भूमिका केली आहे आणि मराठीत चित्रपटसृष्टीत कोरीओग्राफर म्हणून त्याची ओळख होत आहे..
पुण्यात राहणाऱ्या काश्मिरी तरुणांनी आज पत्रकार परिषद घेत आपली व्यथा व्यक्त केली. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले आकिब भट यावेळी म्हणाले की पहलगाममध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, यामध्ये सगळ्यात जास्त दुःख आम्हाला झालं आहे. पण यानंतर खूप आम्हाला खूप धमक्याही यायला लागल्या आहेत. इंस्टाग्रामवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विरोधात पोस्ट पडायला लागल्या.
काश्मीरमध्ये गेलेली मुलं आम्ही आता माघारी येणार नाही असं आता सांगत आहेत. छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्ये कश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे. २० वर्षात खूप मेहनत करुन तिकडच्या मुलांना सुधारवण्यात आल आहे.इकडे शहरात येऊन त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे.अनेक मुलं चांगल्या ठिकाणी काम करत आहेत. पुलवामा घटनेनंतर देखील अनेक मुलं इकडून निघून गेली होती. यात या मुलांचा काहीच दोष नाही तरी देखील त्यांना तिकडे जावे लागते. काश्मीर मधल्या मुलांना तिकडे जी वागणूक मिळत आहे तशीच वागणूक इकडे देखील मिळत आहे असेही आकिब भट यांनी यावेळी सांगितले आहे.
आमचा बॉण्डिंग महाराष्ट्रासाठी खूप चांगल झालं आहे, ते तुटायला नको पाहिजे. काही लोक आहेत जे वातावरण खराब करत आहेत.हे वातावरण खराब व्हायला नको. आम्ही पुण्याच्या पोलीस आयुक्तांना देखील सांगितलं ते देखील ॲक्शन घेत आहेत. काश्मिरी मुलांना पुण्यामध्ये सेफ वाटलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागे देखील आरएसएस आणि बजरंग दलाच्या लोकांनी मीटिंग घेतली होती आणि त्यांनी देखील आम्हाला सपोर्ट केला होता.आता देखील त्यांनी अशी बैठक घेऊन आम्हाला सपोर्ट केला पाहिजे असे भट यांनी सांगितले.
इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने मेसेज करून धमकावलं
पुण्यात जवळपास हजार विद्यार्थी शिक्षण आणि नोकरीसाठी राहात आहेत. ते काही प्रमाणामध्ये आता घाबरलेले आहेत. हिंदू आणि मुस्लिम असा वाद केला जातोय. परंतु जो भाईचारा आहे तो टिकला पाहिजे. पोलिसांनी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आम्हाला द्यावा ज्यांच्याशी आम्ही संपर्क करून आमच्या अडचणी सांगू शकू असे भट यावेळी म्हणाले. मला देखील इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने मेसेज करून धमकावलं आहे. पोलिसांनी आम्हाला कायम मदत केली आहे आता देखील ते मदत करतील अशी आशा असल्याते भट यांनी म्हटलं आहे.
मराठी इंडस्ट्री सोडून कायमचं कश्मीर गाठणार…
मी दोन वर्षाचा असताना माझ्या वडिलांना माझ्यासमोरच दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं होते. मी 2004 पासून पुण्यामध्ये आहे माझं Masters पूर्ण झालं आहे. डान्स करणे हा माझा छंद आहे, मी तर आता मराठी चित्रपटामध्ये देखील काम करतो. ‘रेडू’ चित्रपटात मी काम केलं आहे. अनेक शॉर्ट फिल्म देखील केल्या आहेत.मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील कोरिओग्राफर म्हणून मला ओळखले जाते असे मंजूर शेख याने सांगितले.
कश्मीरमध्ये असताना मी स्वप्न पाहिलं ते इकडे येऊन पूर्ण केलं. अजून देखील काश्मीरमध्ये अशी मुल आहेत त्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत. म्हणून मी या मुलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे अनुभव सांगून त्यांचं आयुष्य सुधाण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून मी नहार सरांशी बोलून कश्मीरमधील अनेक भागात जाऊन तेथील मुलांशी संपर्क केला आहे.शिक्षण पूर्ण करून असे 15 ते 20 जण आहेत जे कश्मीरमध्ये पुन्हा परतले आहे. मी देखील एक तारखेपासून आता काश्मीरमध्ये परमनंट राहण्यासाठी जातोय आणि तिथल्या मुलांसाठी काम मी काम करणार आहे असेही मंजूर शेख यांनी म्हटले आहे.
…तिथल्या मुलांसाठी काम करणार
मुंबईमध्ये जेव्हा हल्ला झाला. त्यावेळेस मुंबईतील लोकांवर डाग लागला नाही. पण आता कश्मीरमध्ये हल्ला झाल्यानंतर स्थानिक कश्मिरी लोकांवर डाग लावला जातोय हे वाईट आहे. यामध्ये काश्मिरी नागरिकांचा काही दोष नाहीए..तिथल्या लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलने केली आहेत अशी चार लोक जे यामध्ये सहभागी आहेत त्यांना धडा शिकवणार असे देखील तेथील लोकांनी म्हटलं आहे. काश्मिरी मुलांचा आयुष्य सुधारण्यासाठी सगळ्यात जास्त योगदान महाराष्ट्र सरकारचे राहिले आहे. संजय नहार यांच्या सरहद्द संस्थेने मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोहीम राबवली आणि भटकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणलं आहे.काल 35-40 विद्यार्थ्यांशी आपण बोललो त्यातील पाच ते सहा जणांना अशा प्रकारची धमकी आली आहे. धरम पुछ के मारा था… धर्म बोल के मारेंगे अशा प्रकारचे स्टेटस ठेवले जात आहेत अशी खंत आकिब याने व्यक्त केली आहे.