नारळाच्या मलईचा हेअर मास्क डॅमेज केसांसाठी ठरेल फायदेशीर, केसांच्या समस्या होतील दुर

प्रत्येकाला त्यांचे केस सिल्की आणि चमकदार असावे असे वाटत असते. कारण निरोगी केस केवळ आपले सौंदर्य वाढवतातच असे नाही तर आपले व्यक्तिमत्व वाढविण्यास देखील मदत करतात, म्हणूनच मुलगी असो वा मुलगा, प्रत्येकजण आपल्या केसांची काळजी घेत असतात. पण सध्या उन्हाळ्याच्या या दिवसात जास्त घाम आल्यामुळे बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे स्कॅल्पवर तेलकटपणा आणि कोंडा होतो. उष्णतेपासून केसांचे बचाव करण्यासाठी अनेक महिला या घट्ट वेण्या बांधतात, ज्यामुळे केसांचे कूप कमकुवत होतात आणि केस गळतात. याशिवाय, तीव्र सूर्यप्रकाशामुळे केस खराब होतात, ज्यामुळे स्प्लिट एंड्सची समस्या वाढू शकते आणि केस मधूनच कमकुवत होतात आणि तुटू लागतात. हे टाळण्यासाठी, नारळाची मलई वापरणे फायद्याचे ठरेल, अशावेळेस नारळाची मलाई कसे वापरावे हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

उन्हाळ्याच्या दिवसात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आपण नारळ पाण्याचा समावेश करात असतो. याशिवाय नारळाची मलई देखील अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. नारळाची मलई तुमच्या खराब झालेल्या केसांची दुरुस्ती करण्यासाठी, केस गळती रोखण्यासाठी, केस जाड करण्यासाठी आणि केसांची वाढ जलद करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तर तुम्ही यापासुन केसांचे हेअर मास्क बनवून शकता यासाठी नारळाच्या मलईमध्ये काही गोष्टींमध्ये मिसळून ते लावल्याने खूप चांगले परिणाम मिळतात.

नारळाची मलई, मेथीचे दाणे

एका भांड्यात नारळाची मलई काढा आणि त्यात भिजवलेले मेथीचे दाणे घाला. आता दोन्ही गोष्टी ग्राइंडरमध्ये टाकुन बारीक वाटून घ्या. आता तयार पेस्ट स्कॅल्पपासूप केसांच्या टोकापर्यंत लावा. 40 मिनिटे ते 1 तास केस लावून ठेवल्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोनदा हे करा. तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील.

आवळा आणि नारळाची मलई

जर तुम्हाला तुमचे केस जाड करायचे असतील आणि केस चांगले करायचे असतील तर नारळाची मलई आणि आवळा पावडर मिसळून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या टोकापर्यंत नीट लावा. 1 तासानंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय करत राहा.

अंडी आणि नारळाची मलई

नारळाच्या मलईमध्ये अंडे मिसळून लावनेही केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तर या दोन्ही गोष्टी बारीक करा आणि नंतर केसांना लावा. आठवड्यातून एक किंवा दोनदा हा उपाय केल्याने तुमचे केस मधूनच तुटणे थांबेल आणि ते रेशमी आणि चमकदार होतील. तुमच्या सोयीनुसार खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी तुम्ही कोणताही उपाय करू शकता.

नारळाची मलई आणि कोरफड

खराब झालेले केस रेशमी-चमकदार बनवण्यासाठी नारळाची मलई हा एक उत्तम घटक आहे, याशिवाय, कोरफडीचे हायड्रेटिंग गुणधर्म केसांना मऊ बनवतात. हे दोन्ही घटक ताजे घ्या आणि नंतर त्यांना चांगले बारीक करून पेस्ट बनवा आणि केसांना लावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)