लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला हनीमूनसाठी अशा ठिकाणी घेऊन जाण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, की ते ठिकाण आणि तो क्षण कायमस्वरुपी आपल्या जोडीदाराच्या लक्षात राहावा. अनेक जण हनीमूनसाठी विविध पर्यटन स्थळांची निवड करतात. मात्र ठिकाण ठरवताना अनेकदा बजेटचा देखील विचार करावा लागतो. तुमचं बजेट हे अनेकदा तुमच्या ट्रिपमधे अडसर ठरते, आज आम्ही तुम्हाला अशा तीन पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत. तिथे तुम्ही तुमची ट्रिप अवघ्या वीस हजार रुपयांमध्ये पूर्ण करू शकता.
शिमला
शिमला हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, अनेक कपल्स आपल्या हनीमून ट्रिपसाठी शिमल्याचीच निवड करतात. त्यामागे अनेक कारणं आहेत. एक तर हे हिल स्टेशन स्वस्त आहे, त्यामुळे तुम्हाला पैशांची फारशी चिंता करण्याची गरज नाहीये. डोंगर रांगा, बर्फाच्छदित प्रदेश, तलावाचं नयरम्य दृश्य, देवदार वृक्षांचं जंगल अशी अनेक वैशिष्ट या शहरांची आपल्याला सांगता येतील. तुम्ही जर तुमच्या हनीमून ट्रिपसाठी या ठिकाणाची निवड करणार असाल तर अवघ्या वीस हजारांमध्ये तुम्ही तुमची ट्रीप पूर्ण करू शकाल.
जयपूर
जयपूरला गुलाबी शहर म्हणून देखील ओळखलं जातं. जयपूर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक किल्ले, महाल आणि राजवाडे आहेत. येथील मार्केट देखील जगप्रसिद्ध आहे. तुम्ही जयपूर शहराची ट्रिप आपल्या जोडीदारासोबत एनजॉय करू शकता. ते देखील अगदी कमी खर्चामध्ये तुमच्याकडे वीस हजार रुपये असतील तरी देखील तुम्ही आरामात जयपूरची ट्रिप करू शकता. येथील हॉटेल आणि जेवण देखील स्वस्त आहे.
माउंट आबू
जर तुम्हाला हिल स्टेशन आवडत असेल तर तुमच्याकडे माउंट आबूचा देखील पर्याय आहे. माउंट आबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे. तुम्ही वीस हजार रुपयांच्या बजेटमध्ये या ठिकाणी तीन ते चार दिवसांच्या हनीमून ट्रिपचं नियोजन करू शकता. येथील वातावरण नक्कीच तुम्हाला आवडेल. वीस हजारांमध्ये तीन दिवसांची ट्रिप आरामात होऊ शकते.