कोणती फळे आणि भाज्या एकत्र ठेवू नयेत?
चांगल्या आरोग्यासाठी फळे आणि भाज्या दोन्ही आपल्या दैनंदिन आहाराचा भाग आहेत. यांच्या सेवनाने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. तसेच आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दररोज तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. त्यात या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवण देखील आपल्यासाठी खुप महत्वाचे आहे.
आपल्यापैकी अनेकजण त्यांच्या घरात आठवडाभर पुरतील इतका भाजीपाला व फळे बाजारातून घेऊन येतात. अशातच बऱ्याच वेळा लोक या दोन्ही गोष्टी एकत्र साठवतात. पण असे करताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण काही भाज्या आणि फळे एकत्र ठेवू नयेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लवकर खराब होतील. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊयात की कोणते फळ आणि भाज्या एकत्र ठेवू नयेत.
बटाटे आणि कांदे
बहुतेक घरांमध्ये बटाटे आणि कांदे एकत्र ठेवले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवू नयेत. कांद्यासोबत बटाटे ठेवल्याने ते लवकर अंकुरतात. कांद्यापासून इथिलीन वायू बाहेर पडतो. यामुळेच बटाटे लवकर खराब होऊ लागतात. त्याच वेळी, बटाट्यांमधून बाहेर पडणाऱ्या ओलाव्यामुळे कांदे देखील कुजू लागतात.
टोमॅटो आणि काकडी
भाज्या आणि फळे बहुतेकदा रेफ्रिजरेटरच्या खालच्या भागात ठेवली जातात. काही लोक त्यात काकडी आणि टोमॅटो एकत्र ठेवतात. जर तुम्हीही तुमच्या रेफ्रिजरेटर मध्ये टोमॅटो आणि काकडी एकत्र ठेवले तर आतापासून असे करू नका. टोमॅटोमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे काकडी लवकर होण्यास सुरुवात होते.
द्राक्षे आणि हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यासोबत कधीही द्राक्ष ठेवू नका. द्राक्ष हे इथिलीनचे समृद्ध स्रोत आहे. यामुळे पालक सुकू शकतो. अशा परिस्थितीत दोन्ही एकत्र ठेवू नका.
ब्रोकोली आणि टोमॅटो
ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पण जेव्हा आपण बाजारातुन अधिक प्रमाणात ब्रोकोली खरेदी करतो. अशातच लक्षात ठेवा की टोमॅटोसोबत ब्रोकोली ठेवू नका. असे केल्याने ब्रोकोली लवकर पिवळी पडू लागते आणि त्याचे पोषणही कमी होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)