आजकाल व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कार्यालयीन काम, आणि व्यक्तिगत संवाद ईत्यादी कामांसाठी व्हॉट्सअॅपचा वापर प्रत्येकाने करायला सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणि सुविधा आणत राहतो, ज्यामुळे वापर करणे सोपे आणि अधिक आरामदायक होते. आता, व्हॉट्सअॅपने आणले आहे एक नवीन कॉलिंग फीचर, ज्यामुळे कॉल करणे आणखी सोपे आणि सहज होईल.
परंतू, सध्या हे फीचर सर्व Android फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. हे फीचर केवळ iPhone आणि iOS वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे, त्यामुळे Android यूझर्सला अजून थोडा वेळ वाट पाहावा लागेल.
तुम्हाला विचार येईल की, या नवीन फीचरमध्ये काय विशेष आहे? साधारणपणे व्हॉट्सअॅपवर कॉल करण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सअॅप उघडून कॉन्टॅक्ट शोधावा लागतो आणि मग कॉल करावा लागतो. पण या नवीन फीचरमुळे आयफोन वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपला ‘डिफॉल्ट कॉलिंग अॅप’ म्हणून सेट करण्याची सुविधा मिळाली आहे. याचा फायदा असा की, आता तुम्ही तुमच्या फोनच्या डायलरमधून थेट व्हॉट्सअॅप कॉल करू शकता. व्हॉट्सअॅप उघडून, कॉन्टॅक्ट शोधण्याची गरज नाही.
हे नवीन फीचर सेट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या iPhoneच्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘Default Apps’ पर्याय शोधावा लागेल. त्यानंतर ‘Calling’ किंवा संबंधित पर्याय निवडून व्हॉट्सअॅपला डिफॉल्ट कॉलिंग अॅप म्हणून सेट करा. यामुळे तुम्ही थेट डायलरमध्ये व्हॉट्सअॅप कॉल करू शकता.
सध्या हे फीचर फक्त iPhone वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, पण लवकरच Android फोनसाठीही हे फीचर येईल. त्यामुळे, भविष्यात तुमचं कॉलिंग अनुभव अधिक सोप्पं आणि सुविधाजनक होईल.