ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी इंदापूर तालुक्यातील नीरा खोऱ्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी निरवांगी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी पवार यांनी समजून घेतल्या. भीषण दुष्काळ तसेच दूध दरवाढीच्या प्रश्नावर त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
दूध उत्पादकांना पाच रुपयांचं अनुदान शंभर टक्के टक्के मिळालेच पाहिजे
दूध उत्पादकांना पाच रुपयांचं अनुदान शंभर टक्के टक्के मिळालेच पाहिजे. आजच्या घडीला संसार चालवायला दुधाचा धंदा हा एकमेव धंदा आहे. जेणेकरुन प्रपंच चालतो. दुधाच्या दरवाढीसंबंधीचा प्रश्न सरकारला सांगून बघू. जर सरकारने ऐकले नाही तर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असा सूचक इशारा देताना सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजेत ते निर्णय घेता येत नाहीत. थोडे थांबा मला चार सहा महिन्यात राज्यातील सरकार बदलायचे आहे, असे पवार म्हणाले.
आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना शेतकरी घटकाविषयी आत्मियता नाही
माझ्याकडे १० वर्ष देशाच्या शेतीचे खाते होते. त्यावेळी मी संबंध देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. दुधाला दरवाढ दिली. शेवटी सत्तेचा वापर लोकांसाठी करायचे असतो. पण आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना शेतकरी घटकाविषयी आत्मियता नाही, अशी टीका पवार यांनी केली.