Vijaysinh Mahadik Death : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते विजयसिंह महाडिक त्यांच्या घराच्या छतावरुन खाली पडले. तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्यांना मोठी इजा झाल्याने त्यांचे निधन झाले.
घराच्या छतावरुन खाली पडून निधन
राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातील अनेक भागात उन्हाचा पारा ४० अंशाहून पुढे गेला आहे. अशात डॉक्टरांकडूनही उन्हापासून बचाव करण्याचं वारंवार सांगण्यात येतं. तसंच उन्हात आपली काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. अशात उन्हाच्या तीव्रतेने चक्कर येऊन विजयसिंह महाडिक यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयसिंह महाडिक त्यांच्या घरातील छतावर गेले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली. चक्कर आल्याने ते घराच्या छतावरुन तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली कोसळले. इतक्या उंचावरुन अचानक, तसंच बेसावधपणे खाली पडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाली. यातच गंभीर जखमी झाल्याने यात त्यांचं निधन झालं.Nanded News : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही, पण शक्तीपीठ मार्गासाठी सरकारला घाई, कारण… बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बजावली महत्त्वाची भूमिका
विजयसिंह महाडिक हे गेली तीन दशके सामाजिक क्षेत्रात प्रभावीपणे कार्यरत होते. मराठा आरक्षणासाठी ते १९९६ पासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चळवळ उभी केली होती. २००५ साली सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात सिंहाचा वाटा होता. २००६ सालापासून मराठा आरक्षण चळवळ त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्र केली. २०१६ साली मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
Sangli News : उन्हामुळे चक्कर आली, तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडले; मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते विजयसिंह महाडिक यांचे निधन
महाराष्ट्रातील ४२ संघटना एकत्रित करून त्यांनी मराठा आरक्षण समन्वय समिती स्थापन केली. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मोर्चे, आंदोलने, पदयात्रा, गोलमेज परिषदा घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम सुरू ठेवलं. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.