तुम्हीही बनावट केशर खात आहात का? खरेदी करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

केशर खूप फायदेशीर आणि आरोग्यदायी असते. केशर जितके फायदेशीर असले तरी तितकेच ते खूप महाग आहे. केशर हे गोड पदार्थांमध्ये, दुधात मिसळले तरी किंवा त्वचेच्या काळजीसाठी फेसपॅकमध्ये मिक्स करतो तेव्हा केशर सर्वत्र आपली जादू दाखवते. तसेच केशरला आयुर्वेदातही खूप फायदेशीर मानले जाते; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते त्वचेच्या चमकदारपर्यंत सर्व गोष्टींमध्ये ते प्रभावी आहे. केशरचे अनेक फायदे असल्याने ते आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी खरेदी करत असतो. अशातच खरे केशर जितके फायदेशीर आहे तितकेच बनावट केशर आरोग्यासाठी तितकेच धोकादायक असू शकते. आजकाल बाजारात भेसळयुक्त आणि बनावट केशर सर्रास विकले जात आहे, जे केवळ तुमचे पैसे वाया घालवत नाही तर शरीरालाही नुकसान पोहोचवू शकते.

त्यामुळे अशा परिस्थितीत, खऱ्या आणि बनावट केशरमध्ये काय फरक आहे आणि ते खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. खरे केशर ओळखण्यासाठी तुम्ही या 5 सोप्या टिप्स वापरू शकता.

कॅमिकलयुक्त केशर रंग लगेच सोडतो

तुम्ही जेव्हा बाजारातून खरा केशर खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा की खरा केशर हा कधीच लगेच रंग सोडत नाही. जेव्हा तुम्ही पाण्यात किंवा दुधात खरे केशर घालता तेव्हा ते 10-15 मिनिटांत हळूहळू त्याचा रंग पदार्थात मिक्स होत असतो आणि त्याचा सुगंध टिकून राहतो. बनावट केशर घातल्यानंतर लगेचच गडद रंग पदार्थांमध्ये मिक्स होतो, जो कॅमिकलयुक्त बनावट केशर असतो.

सुगंधाने ओळखा

खऱ्या केशराचा सुगंध थोडा गोड आणि मातीसारखा असतो, त्यात थोडा मध आणि थोडासा गवत असतो. बनावट केशर एकतर पूर्णपणे सुगंधमुक्त असते किंवा त्याला तिखट, कॅमिकलसारखा वास येत असतो.

पाण्यात विरघळल्यावरही तंतू राहतात

जेव्हा तुम्ही केशर पाण्यात टाकता आणि काही वेळाने ते कुस्करता तेव्हा खऱ्या केशरचे तंतू तसेच राहतात आणि विरघळत नाहीत. तर बनावट केशर पाण्यात विरघळू शकते आणि पूर्णपणे नाहीसे होऊ शकते किंवा तुटू शकते.

किंमत पाहून समजून घ्या

केशर खूप महाग असते. जर कोणी तुम्हाला केशर खूप स्वस्त दरात विकत असेल तर समजून घ्या की त्यात काहीतरी गडबड आहे. खऱ्या केशरची किंमत कमी होत नाही आणि जरी ते स्वस्तात उपलब्ध असले तरी त्याची गुणवत्ता भेसळयुक्त असू शकते. हे लक्षात ठेवा.

ब्रँड आणि पॅकेजिंग तपासा

जेव्हाही तुम्ही केशर खरेदी करता तेव्हा ते नेहमी विश्वासार्ह ब्रँडकडूनच खरेदी करा. स्थानिक दुकानातून किंवा उघड्यावर केशर खरेदी करू नका. तसेच, पॅकेजिंगवर FSSAI क्रमांक, उत्पादन तारीख आणि ब्रँडचे नाव तपासा.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)