मुंबईकरांची लाइफलाइन नावाने ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर रोजच तूफान गर्दी असते. सोमवार ते शनिवार गर्दीची, ऑफीसची वेळ तर रविवारी बरेच लोकं सुट्टी असूनही फिरायला बाहेर पडतात. या रविवारी तु्म्हीसुद्धा असंच बाहेर जायचा प्लान करत असाल तर थांबा, ही बातमी वाचा आणि मगच प्लान आखा. कारण लोकांची लाइफलाईन असलेल्या मध्य रेल्वेचा रविवारी खोळंबा होणार आहे, त्याचं कारण म्हणजे रविवारी सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
हो, हे खरं आहे. रविवारी 20 एप्रिल रोजी, मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वरून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे या काळात बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तसे नियोजन करूनच बाहेर जा.
पश्चिम रेल्वेचा आज ब्लॉक
कोठून कुठपर्यंत? : वसई रोड-वैतरणा
कोणत्या मार्गावर? : जलद
कधी? : शुक्रवारी रात्री – शनिवारी पहाटेपर्यंत
किती वाजता? : अप फास्ट मार्गिका रात्री 11.50 ते 2.50
डाउन फास्ट मार्गिका रात्री 1.30 ते पहाटे 4.30
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक
कोठून कुठपर्यंत? : सीएसएमटी – विद्याविहार
कोणत्या मार्गावर? : अप आणि डाऊन धीम्या
कधी? : रविवारी, 18 एप्रिल
किती वाजता? : सकाळी 10.55 ते दुपारी 3.55
परिणाम ? : ब्लॉक कालावधीत मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध नसणार आहेत.
हार्बर रेल्वेवरही ब्लॉक
कोठून कुठपर्यंत? : ठाणे आणि वाशी / नेरूळ दरम्यान
कोणत्या मार्गावर? : अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर
कधी? : रविवारी
किती वाजता? : सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10
परिणाम ?: ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी / नेरूळ / पनवेल दरम्यान डाऊन आणि अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.