मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले अखेर पुण्यात दाखल झाले आहेत. ते लवकरच आता बीड किंवा पुणे पोलिसांना सरेंडर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड यांच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला मिळाली होती, असा दावा काही दिवसांपूर्वी रणजित कासले यांनी केला होता. त्यानंतर ते आज पुण्यात दाखल झाले आहेत.
नेमकं काय म्हणाले रणजित कासले?
रणजित कासले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असा दावा कासले यांनी केला आहे. त्यांनी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील यावेळी दाखवलं आहे. तसेच वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरबाबत देखील त्यांनी मोठा दावा केला आहे.
‘मला एन्काऊंटरबद्दल प्रश्न विचारण्यात आले, माझ्याकडे पुराव्याची मागणी करण्यात आली. अरे एन्काऊंटरचा आदेश असा उघडपणे कोणी देईल का? एन्काऊंटरच्या ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व चर्चा या बंद दाराआड झाल्या, असं रणजित कासले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ज्या दिवशी मतदान होतो, त्या दिवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये आले. वाल्मिक कराडची जी कंपनी आहे, संत बाळूमामा कंट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, ज्यामध्ये महादेव कराड आणि काळे हे पार्टन आहेत. त्यांच्या कंपनीमधून माझ्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले. त्यातले मी साडेसात लाख रुपये परत केले. जे उरलेले अडीच लाख रुपये आहेत त्यातून माझा खर्च सुरू आहे. ईव्हीएमपासून तुम्ही दूर राहायचं, यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते. असं रणजित कासले यांनी म्हटलं आहे. मी पुणे पोलिसांच्या सतत संर्पकात आहे, मी पोलिसांना शरण जाणार आहे, अशी माहितीही यावेळी कासले यांनी दिली आहे.