वाढते वजन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर परिणाम होत असतात. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आहारात पौष्टिक अन्न पदार्थांचा समावेश करत आहेत. त्यातच वजन कमी करण्यासाठी काहीजण डाएट देखील करत आहे. यामध्ये आता व्हेगन डाएट हा खूप ट्रेंडिंग आहे आणि अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही हा डाएट फॉलो केला आहे. खरं तर हा डाएट फॉलो करण्यामागील कारण म्हणजे यातील आहार आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी देखील खूप चांगला मानला जातो, सॅच्युरेटेड फॅट शरीरात कमी जाते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता कमी असते. तसेच हा डाएट प्लॅन तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून वाचवते. व्हेगनिज्ममध्ये मांसाहारीचे कोणतेही अन्न सेवन केले जात नाही, तसेच या डाएटमध्ये दूध असो, दही असो किंवा चीज असो हे देखील सेवन केले जात नाही. अशा परिस्थितीत, प्रथिनांची गरज कशी पूर्ण होईल याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. तथापि, असे अनेक पदार्थ आहेत जे प्लांट बेस्ड आहेत आणि प्रथिने समृद्ध आहेत.
व्हेगन आहार आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. तथापि हा डाएट करताना काही पोषक तत्वांच्या कमतरतेची भीती कायम असते, त्यापैकी एक म्हणजे प्रथिने. जर तुम्हीही व्हेगन डाएट करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या प्रथिनांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या याबद्दल काळजीत असाल, तर तुमच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करा जे प्लांट बेस्ड प्रथिनांनी समृद्ध आहेत. चला तर मग जाणून घ्या.
सोयाबीन आणि त्याची उत्पादने
व्हेगन डाएट करताना प्लांट बेस्ड असलेल्या प्रथिनांबद्दल बोलायचे झाले तर, सोयाबीन हे एक उत्कृष्ट पदार्थ आहे. अशातच बहुतेक लोक सोयाबीन सेवन करतात. पण तुम्ही सोयाबीनच्या शेंगाचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. याशिवाय, तुम्ही सोया दूध पिऊ शकता आणि त्यापासून बनवलेले टोफू देखील खाऊ शकता.
हे नट्स देखील प्रथिने समृद्ध
प्रथिनांची कमतरता तसेच इतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी नट्स हे उत्कृष्ट स्त्रोत आहे. प्रथिनांबद्दल बोलायचे झाले तर व्हेगन डाएट करताना शेंगदाणे खाऊ शकतात. पाण्यात भिजवलेल्या शेंगदाण्यांपासून ते त्यापासून बनवलेल्या बटरपर्यंत, आहारात समाविष्ट करता येते. याशिवाय बदाम, अक्रोड, काजू इत्यादींमध्येही प्रथिने भरपूर असतात.
वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी
व्हेगन डाएट करत असो वा शाकाहारी, प्रथिनांच्या बाबतीत डाळी हा एक उत्तम पर्याय आहे, जो तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करू शकता. तुरीची डाळ, मसूर डाळ, मूग आणि उडीद डाळपर्यंत अनेक प्रकारच्या डाळी आहेत, ज्यांचा आहारात समावेश करू शकता.
तुमच्या आहारात या सीड्सचा समावेश करा
प्रथिनांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही चिया सीड्स, सब्जा सीड्स, भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल बिया इत्यादी तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता, जो एक प्रथिनांचा चांगला पर्याय आहे.
स्पि्रुलिनामध्ये प्रथिने जास्त
पाण्यात वाढणारी स्पि्रुलिना ही भाजी नाही तर एक शैवाल आहे जी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच फॅटी ॲसिडचा स्रोत आहे. यासोबतच त्यात प्रथिने देखील आढळतात. जी लोकं व्हेगन डाएट फॉलो करतात त्यांच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)