गुगल साइन-इन करताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा प्रायव्हसी येऊ शकते धोक्यात

आजकालच्या डिजिटल युगात आपण नवनवीन अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स वापरत असतो. त्यामध्ये लॉगिन करताना “Sign in with Google” हा पर्याय फारच सोयीचा वाटतो. कारण त्यामुळे नवं अकाऊंट तयार करण्याचा त्रास टळतो आणि वेगळा पासवर्ड लक्षात ठेवायची गरजही भासत नाही.

मात्र हीच सवय आपल्या ऑनलाईन सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकते, हे अनेकदा आपण लक्षात घेत नाही. कारण Google अकाऊंट हे केवळ लॉगिनसाठी नसून, ते आपल्या संपूर्ण डिजिटल आयुष्याची ‘मास्टर चावी’ आहे. Gmail, Google Drive, Google Photos, YouTube यासारख्या महत्त्वाच्या सेवा या एका खात्याशी जोडलेल्या असतात.

म्हणूनच, जेव्हा आपण कुठल्याही अज्ञात किंवा अनोळखी अ‍ॅपला “Sign in with Google” वापरून परवानगी देतो, तेव्हा आपण नकळतपणे आपल्या डिजिटल जगाची ‘मुख्य चावी’ त्यांच्या हाती देत असतो. हा निर्णय तुमच्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकतो. म्हणूनच या काही टीप्स लक्षात ठेवा आणि आपले अकाऊंट सुरक्षीत ठेवा.

तुमचं Google अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या टीप्स

1. नवीन अ‍ॅप्सवर लॉगिन करताना त्या अ‍ॅपचा विश्वासार्ह स्रोत आहे का, याची खात्री करा. अज्ञात अ‍ॅप्सना ‘Sign in with Google’ देणं टाळा.

2. महत्त्वाचं Gmail अकाऊंट वापरण्याऐवजी, वेगळी Google ID तयार करा. अ‍ॅप्स टेस्ट करायचे असतील, फॉर्म भरायचे असतील तर हे अकाऊंट वापरा. त्यामुळे तुमचं मुख्य अकाऊंट सेफ राहील.

3. पूर्वी वापरलेले अ‍ॅप्स अजूनही तुमच्या Google अकाऊंटला जोडलेले असू शकतात. त्यांचा ॲक्सेस काढून टाका. यासाठी Google Account सेटिंग्जमध्ये ‘Third-party access’ तपासा.

4. फक्त पासवर्ड नको – ‘2 Step Verification’ लावा. म्हणजे कुणी पासवर्ड जाणला तरी तुमच्या मोबाईलवर कोड येणार, आणि तुमच्याशिवाय कुणीही लॉगिन करू शकणार नाही.

5. ‘password123’ किंवा वाढदिवस टाकून पासवर्ड ठेवणं म्हणजे चोरांना आपल्या अकाऊंटची सरळ “मास्टर की” देण्यासारखं आहे.म्हणूनच स्ट्राँग आणि यूनिक पासवर्ड वापरा. लक्षात ठेवणं अवघड वाटत असेल, तर पासवर्ड मॅनेजर वापरा.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)