उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या काळे आणि जाड केस हवेत, मग फक्त एकच गोष्ट करा, लगेचच होईल फायदा

उन्हाळा सुरू झाल्याने कडक उन्हाचा आणि वातावरणातील गरम हवेचा त्रास आरोग्याबरोबर शरीरावर देखील होत असतो. त्यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. धूळ, अतिनील किरणे आणि घामामुळेही केस खराब होतात. या ऋतूत स्कॅल्प आणि केस कोरडे होतात आणि त्यामुळे केस गळू लागल्याने खूपच निर्जीव दिसू लागतात. यासाठी अनेकजण या समस्यांपासून सुटका मिळवण्याकरिता बाजारात उपलब्ध असलेले महागडे कॅमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करत असतात. त्यांच बरोबर केराटिन ट्रीटमेंट देखील केली जाते. पण जर तुम्हाला केस नैसर्गिकरित्या काळे आणि जाड करायचे असेल तर कोरफड जेल केसांना लावणे हा उत्तम पर्याय आहे. कारण कोरफडीच्या अनेक गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात केसांचे संरक्षण करण्यास खूप प्रभावी आहे.

यासोबतच कोरफड केसांना मजबूत, चमकदार आणि निरोगी बनवण्यास मदत करते आणि केस गळणे आणि कोंडा यासारख्या समस्या देखील कमी होतात. कोरफड जेलचा वापर तुम्ही केस धुतल्यानंतर सुद्धा थेट स्कॅल्पला लावू शकता. कोरफड जेल लावताना तुम्ही या 5 टिप्स फॉलो केल्यानंतर केसांचे नुकसान न होता केसांना इतरही अनेक फायदे होतील.

कोरफड जेल आणि नारळ तेल

तीव्र सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे होतात आणि दुतोंडी केसांच्या समस्या उद्भवतात. अशावेळी तुम्ही कोरफड जेल आणि नारळ तेल मिक्स करून त्यांचा हेअर मास्क बनवणे खूप फायद्याचे ठरेल. कोरफडीमध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि ई असतात, जे निरोगी सेल्सला वाढवतात आणि तुमच्या केसांना नैसर्गिक चमक देतात. नारळाचे तेल केसांना मऊ करते, कोरडेपणा दुर करते. त्यासोबतच केसांना अतिनील किरणांपासून संरक्षण करते व केसांना मजबूत बनवते. हा मास्क बनवण्यासाठी, 1 चमचा नारळ तेल आणि 3 चमचे कोरफडीचे जेल मिक्स करून मिश्रण तयार करा. हे मास्क केसांवर आणि स्कॅल्पवर लावा आणि 40 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

कोरफड आणि कांद्याचा रस

केस गळती रोखण्यासाठी कोरफड आणि कांद्याचा रस हे एक उत्तम मिश्रण आहे. कोरफडीमध्ये असलेले व्हिटॅमिन बी, अँटीऑक्सिडंट्स आणि फॉलिक अॅसिड केस गळती थांबवतात आणि त्यांना पोषण देखील देतात. कांद्याच्या रसात सल्फर, अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म भरपूर असतात, जे केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखतात आणि त्यांना मजबूत बनवतात. यांचा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी 2 चमचे कांद्याचा रस 3 चमचे कोरफड जेलमध्ये मिक्स करा. आता तयार झालेला हेअर मास्क स्कॅल्प आणि केसांना लावा. 30-40 मिनिटांनी सौम्य शाम्पूने केस धुवा.

कोरफड जेल आणि दह्याचा हेअर मास्क

कोंडा दूर करण्यासाठी आणि मऊपणा वाढवण्यासाठी कोरफडीचा आणि दह्याचा हेअर मास्क हा एक चांगला पर्याय आहे. कोरफडीतील अँटीसेप्टिक गुणधर्म खाज कमी करतात, तर दह्यामधील अँटी-फंगल गुणधर्म कोंडा दूर करतात. योग्य प्रमाणात दही घेऊन कोरफडीच्या जेलमध्ये चांगले मिक्स करा. स्कॅल्प आणि केसांना लावून मसाज करा. त्यानंतर 45 मिनिटांनंतर, सौम्य शाम्पूने केस धुवा.

कोरफड आणि लिंबाचा रसाचा हेअर मास्क

तेलकट स्कॅल्प आणि कोंड्यासाठी कोरफड आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण खूप उपयुक्त आहे. कोरफडीतील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म स्कॅल्प स्वच्छ करतात, तर लिंबाच्या रसातील आम्लयुक्त गुणधर्म डोक्यातील कोंडा कमी करण्यास मदत करतात. या हेअर मास्कसाठी 1-2 चमचे लिंबाचा रस 2-3 चमचे कोरफडीच्या जेलमध्ये मिक्स करा. तयार झालेला हा हेअर मास्क स्कॅल्पवर लावा आणि 15-20मिनिटे तसेच राहू द्या. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

सीरमऐवजी कोरफड जेल वापरा

उन्हाळ्यात केसांच्या सीरमऐवजी कोरफड जेल वापरा. हे केसांना मॉइश्चरायझेशन देते आणि केसांच्या वाढीस देखील चालना देते. कोरफडीचा जेल स्टायलिंग जेल म्हणून देखील वापरता येतो, विशेषतः कोरड्या आणि कुरळ्या केसांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)