Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या नाशिकच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले. आपल्या या भषणात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. हिंदुत्त्व, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आदी मुद्द्यांवर बोलताना त्यांनी भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच आपल्या भाषणात बोलत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीही नक्कल केली. मला बाप चोरण्याची जरज नाही, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला.
हिंदुत्त्वाला काही शेंडा-बूड आहे की नाही?
भाजपाचे हिंदुत्त्व हे बेगडी आहे, असा दावा ठाकरेंनी केला. “आपल्याकडे गोवंश हत्याबंदी आहे. माझा त्याला विरोध नाही. पण जे किरण रिजिजू म्हणाले होते की ते गोमांस खातात. तेच आता तुमचे मंत्री आहेत. रस्त्यात संशय आला म्हणून तथाकथित गोरक्षकांनी त्याचा पाठलाग केला आणि गोळ्या घालून मारलं. पण रिजिजू तुमच्या बाजूला बसून वक्फ बोर्ड सुधारणेचं विधेयक मांडतात. मग तुमच्या हिंदुत्त्वाला काही शेंडा-बूड आहे की नाही?” असा हल्लाबोल ठाकरेंनी भाजपावर केला आहे.
मात करूण पुढे जाण्याची हिमंत…
“या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आता महाराष्ट्रावर खरी जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्रा देशाला दिशा दाखवत आला हे आपण इतिहासात ऐकलेलं आहे. आपण नालायक ठरू शकत नाही. कधीकधी खड्डे येतात. पण त्यावर मात करूण पुढे जाण्याची आपल्याला हिंमत पाहिजे,” असे म्हणत ठाकरेंनी कार्यकर्त्यांत उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.
मी दाढी वाढवलेली नाही
तसेच पुढे बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री यांची नक्कल केली. “खड्ड्यांवर मात करून पुढे जाण्याची हिंमत पाहिजे. म्हणूनच मी एक गोष्ट सर्वांना सांगतो. आणि…म्हणून… (एकनाथ शिंदे यांच्या भाषण शैलीत) असं नाही. कारण अजूनही मी खाजवायला दाढी वाढवलेली नाही. मला असे दुसऱ्याचे वडील चोरायची गरजही नाही. जे आहेत एसंशी त्यांना सोडून द्या,” अशी उपहासात्मक टीका ठाकरेंनी शिंदेंवर त्यांचे नाव न घेता केली.
महाराष्ट्र त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही- ठाकरे
शिवसैनिकांना उद्देशून ते म्हणाले की, लढण्यासाठी तलवार लागते. पण लढण्यासाठी अगोदर मन असावे लागते. हा पराभव मी मानायला तयार नाही. आपला पराभव खोट्या पद्धतीने दाखवला गेला आहे. आजही निवडणूक झाली तर त्यांच्यापेक्षा जास्त मतांनी आणि संख्याने आम्ही निवडून येऊ. तसेच एकदिवस महाराष्ट्र त्यांना (विरोधक) त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.