Benefit Of Expressing Love To Wife : घराबाहेर निघण्यापूर्वी नवऱ्याने बायकोसोबत नक्की करावं हे काम; आयुष्यात होतील अनेक फायदे

यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं आपल्याकडे कायम म्हंटलं जातं. नवरा बायकोचं नातं याच नियमावर चालत असतं. एकमेकांना सुख-दु:खात सोबत केल्यावर दोघांचंही आयुष्य सुखकर होत असतं. नवरा बायकोमधील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी ते व्यक्त करणं खूप गरजेचं असतं. पण हे केवळ नात्यासाठी नाही तर पण वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील या प्रेम व्यक्त करण्याचा फायदा नवऱ्याला होऊ शकतो. एका वैज्ञानिक अहवालातून असं सिद्ध झालं आहे की, रोज घराबाहेर पडण्यापूर्वी जर नवऱ्याने ही एक गोष्ट करून आपल्या बायकोबद्दल प्रेम व्यक्त केलं तर त्याची आयुष्यात कायम प्रगती होते. आज आम्ही तुम्हाला आपल्या बायकोवर प्रेम व्यक्त करण्याची हीच पद्धत सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील फायदा होईल.

रोज घरा बाहेर निघण्यापूर्वी करा आपल्या बायकोला Kiss

आपण अनेक चित्रपटात बघतो की, नायक ऑफिसला जाण्यापूर्वी किंवा घराबाहेर निघण्यापूर्वी नायिकेला किस करतो. आपल्याला ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत वाटते. मात्र काही अभ्यासातून असं निदर्शनास आलेलं आहे की, या किस करण्याचे काही फायदे देखील आहेत. हे फायदे वाचून तुम्ही देखील चकित व्हाल.

चित्रपटातच नाही तर बरेच कपल हे खऱ्या आयुष्यात देखील आपल्या जोडीदाराला किस करतात. किस करणं हा त्यांच्यातील प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहेच. त्यातही ऑफिसला जाताना बायकोला नवऱ्याने किस केल्याने त्याला मोठा फायदा होतो. बायकोला किस केल्याने नवऱ्याचं आयुष्य साधारणत: 4 वर्षांनी वाढतं.

जर्मनीमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असं निदर्शनास आलेलं आहे की, जे पुरुष दररोज सकाळी ऑफिसला जाताना आपल्या बायकोला प्रेमाने किस करून बाय करतात ते कायम आनंदी, तणावमुक्त आणि निरोगी राहतात. अशा पुरुषांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आणि दिवसाची सुरुवात देखील सकारात्मक ऊर्जेने होते. त्यामुळे त्यांचा दिवस देखील चांगला जातो.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

तज्ञांच्या मते, जेव्हा नवरा आपल्या बायको प्रती प्रेम व्यक्त करतो तेव्हा त्याच्या शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोनची पातळी वाढते, ज्याला लव्ह हार्मोनही म्हणतात. हा हार्मोन तणाव कमी करतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं आणि हृदयाचं आरोग्यही राखतं. इतकंच नाही तर, ही सवय फक्त बायकोला आनंदी करत नाही तर तुम्हालाही मानसिकरित्या संतुलित करते आणि मोटिव्हेडेट ठेवते. किस केल्याने तुम्ही आनंदी राहता आणि आनंदी राहिल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. त्यामुळे कोणत्याही आजाराशी लढण्याची ताकद तुमच्या शरीरात तयार होते. किस केल्याने तणाव कमी राहतो, मेंदू शांत राहतो. सकारात्मक भावना हार्टबीट आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करतात.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)