..ते त्याचा एन्काऊंटर करायला सांगू शकतात, करुणा शर्मा यांचा कासलेला पाठींबा

बीड जिल्हा गेल्या डिसेंबरपासून राज्यात चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृन पद्धतीने हत्या झाल्यानंतर या जिल्ह्याची देशात चर्चा सुरु आहे. या जिल्ह्यातील गुन्हेगारी बिहार आणि युपीला लाजविणारी असल्याचे वारंवार समोर येत आहे. देशमुख हत्ये प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटर करण्याची ऑफर मला होती असा दावा निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले याने केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यातच आता करुणा शर्मा यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.

बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले याने व्हिडीओद्वारे वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती असा दावा करुन खळबळ उडविली आहे. त्यावर आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोटगीसाठी याचिका दाखल करणाऱ्या करुणा शर्मा यांनी या प्रकरणात मीडियाशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की वाल्मीक कराड हा काही साधारण व्यक्ती नाही. गेली चाळीस वर्षे मुंडे फॅमिली बरोबर तो असून त्याची एक हाती गुंडागर्दी होती. धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या जोरावरती गुन्हेगारी करत होता असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

मुंडे एन्काऊंटर करायला सांगू शकतात

पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी काल त्यांना वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटीची ऑफर होती असे जे सांगितले आहे त्यावर कराडला संपवायला ते पाच कोटीच नाही तर शंभर कोटीची ऑफर देखील देऊ शकतात असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांची पूर्ण कुंडली कराडकडे आहे. त्यांची कुंडली उघडपणे लोकांसमोर येऊ नये यासाठी बहुतेक धनंजय मुंडे एन्काऊंटर करायला सांगू शकतात असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. पीएसआय कासले याच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तो कोणत्या व्यक्तीच्या दबावाखाली झाला याची चौकशी व्हायला हवी कारण या पाठी फक्त धनंजय मुंडे यांचाच फायदा आहे असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जणांची कुंडली आहे आणि ती वाल्मीक कराडकडे मुंडे यांनी ठेवलेली आहे.त्यामुळे यावर मोठे सत्ताधारी राजकारणी मंत्र्यांची मंत्रीपदे जाऊ शकतात. वाल्मीक कराड यांच्या जीवाला देखील धोका आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट केलं पाहिजे ही माझी मागणी असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

माझी हात जोडून विनंती

कासले जे म्हणत आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्याची चौकशी करावी असेही मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे. कधीतरी असे ऑफिसर समोर येतात नाहीतर काहीजण आत्महत्या देखील करतात. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते ज्या लोकांची राजकारणी लोकांनी अन्याय करून नोकरी घेतली.त्यांनी कासले यांनी जो प्रयत्न केलाय त्यांना साथ द्यावी त्यांच्यासोबत राहावे

महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांना न्याय मिळणार नाही. राजकीय लोकं पोलीस अधिकाऱ्यांचा गैरवापर करून अशाच प्रकारे निलंबित करणार असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात आहे की नाही माहीती नाही. कारण माझ्याकडे त्याविषयी पुरावे नाही म्हणून मी सांगू शकत नाही. माझ्याकडे जे पुरावे असतात मी त्याचीच गोष्ट करते. कुठल्याही गोष्टीवर मी आरोप करत नाही असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

 ते सकाळी सहा वाजता पिऊन व्हिडिओ करतील का

कासले याचाही बळी गेला म्हणून त्यांचं डोकं गरम झालं आहे, त्यामुळे ते सगळ्यांची गोष्टी उघड करत आहेत. तो एक पोलीस अधिकारी आहे, त्यामुळे त्यांच्यागोष्टी वर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. सकाळी.. सकाळी ते  सकाळी सहा वाजता पिऊन व्हिडिओ करतील का ?
महाराष्ट्रात सगळं काही घाणेरडे राजकारण सुरू आहे. माझ्यावर दोन वेळा ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झालेला आहे. कासले वरती ही कोणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. कोणत्या नेत्याच्या दबावा खाली केला त्याची चौकशी व्हावी असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

केंद्राची एसआयटी टीम लावावी

गृहमंत्री खरे आहेत. त्यांचा धनंजय मुंडे यांना सपोर्ट नाही, त्यांनी खरी चौकशी करावी आणि पीएसआय कासले यांना प्रोटेक्शन देऊन. त्यांच्याकडून सगळ्या लोकांची कुंडली बाहेर काढावी अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. केंद्राची एसआयटी टीम लावणं यात कुठलेही नुकसान नाही.आधी या प्रकरणी जो पोलिस अधिकारी तपास करत होता तो त्याच्याबरोबर जेवत असण्याचा स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे केंद्राची एसआयटी टीम नेमावी ही गरजेची आहे असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)