आंदोलन करण्याचा मनाई आदेशाविरोधात युवा सेनेचे मुंबई विद्यापीठासमोर आंदोलन

Mumbai university: मुंबई विद्यापीठाने विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्यास मनाई करणारे पत्रक काढले आहे. आंदोलनाचा अधिकार नाकारणाऱ्या आदेशाविरोधात मुंबई विद्यापीठातील युवा सेना आणि प्राध्यापक संघटना ( बुक्टू)कडून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धिक्कार, असो धिक्कार असो अशा घोषणा युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी केले.

मुंबई विद्यापीठातील परीक्षांतील गोंधळ, पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांना बसणारा फटका, एनईपीच्या अंमलबजावणीतील त्रुटी, त्याचबरोबर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी यावर आदित्य ठाकरे यांची युवासेना आक्रमक झाली आहे. युवा सेनेतील सिनेट सदस्य आणि बुक्टू या संघटनेकडून मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

मागील महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक झाली होती. ही बैठकही वादळी ठरली होती. ठाकरे गटाच्या युवा सेनेचे १० आणि बुक्टुच्या ८ अधिसभा सदस्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये प्रवेश करीत आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही, विद्यार्थ्यांच्या हिताचे ऐकत नाही, परीक्षा भवनच्या गोंधळाबाबत बोलत नाही, राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर नतमस्तक, असा आरोप करत युवा सेनेने आंदोलन केले होते. सध्या मुंबई विद्यापीठाच्या कारभारावरुन युवा सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. या संघटनेला प्राध्यापक संघटनेची साथ मिळत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे.

विद्यापीठाचे बनावट फेसबुक पेज

मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक पेज तयार करण्यात आले. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असताना विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यासाठी सायबर भामट्यांनी हे पेज तयार केले. त्याबाबत मुंबई विद्यापीठाने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनवण्यात आलेले फेसबुक पेज https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर होते. त्यावर विद्यार्थ्यांनी माहिती भरल्यावर एका संशयास्पद वेबसाईटवर ती लिंक जात होती. सध्या सायबर क्राईम विभागाने ते पेज डेलिट केले आहे. आरोपीचा शोधही घेतला जात आहे. सायबर विभागाने विद्यार्थ्यांना बनावट फेसबुक पेजपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)