मोठी बातमी ! वाल्मिक कराडला काम संपल्यावर मारण्याचा प्लान?; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरूंगात कैद आहे. कराड आणि त्याच्या गँगचे अनेक कारनामे गेल्या तकाही महिन्यात समोर आले आहे. दरम्यान वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये असतानाच एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मोठा दाव केल्याने प्रचंड खळबळ माजली. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती, असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी नुकताच केला होता. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं असून अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे. ‘ ते ( कासले) निलंबित अधिकारी आहेत, त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की मला एन्काऊंटर करण्याच्या सूचना होत्या. म्हणजे फेक एन्काऊंटर्स देशात, महाराष्ट्रात अलीकडच्या काळात घडली आहेत. त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे. त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अमुक पोलिस स्टेशनच्या डायरीत अशा प्रकारची नोंद केलेली आहे तर ते अधिक गंभीर आहे. अशी नोंद पोलीस डायरीत केलेली असेल तर त्यावरती तेव्हाच ॲक्शन का घेतली नाही’ असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. वाल्मिक कराड असेल किंवा धनजंय मुंडे, यातील वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असा प्लान दिसतोय, काम संपल्यावर कराडल मारण्याच प्लान होता का असा दावाच राऊतांनी केला असून मोठी खळबळ माजली आगहे. तसेच यामागे कोण, हे लोकांसमोर यायला पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

तसेच बीड घटनेपेक्षा भयंकर घटना सिंधुदुर्ग मध्ये घडली आहे. यासाठी वेळ पडली तर आम्ही कोकणात जाणार आहोत. आतापर्यंत तिथे 27 खून झाले आहे, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे. सिंधुदुर्गाताजही हत्याकांड सुरू आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

वाल्मिक कराडला अटक करण्याच्या चार दिवस अगोदर त्याचे एन्काऊंटर करण्याची मला ऑफर होती, असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी केला. कासले यांच्या या विधानानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. कासले यांचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये त्यांनी मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाली होती, असा दावा केला होता. बोगस एन्काऊंटर कसं केलं जातं, हे मी तुम्हाला सांगतो. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती. मात्र मी ही ऑफर नाकरली होती. माझ्याकडून एवढं पाप होणार नाही, असं मी सांगितलं होतं, असा दावा कासले यांनी केला.

सुप्रिया सुळे यांचंही ट्विट

दरम्यान राष्ट्र्वादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक ट्विट केलं आहे. परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा खून होऊन दीड वर्ष होत आले. परंतु अद्यापही त्यांचे मारेकरी मोकाट आहेत. आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी या कुटुंबीयाने आंदोलन देखील केले होते. सामान्य नागरीकांवर न्यायासाठी अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ येते ही अतिशय खेदजनक व गंभीर बाब आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की कृपया याप्रकरणी आपण आतापर्यंत काय कारवाई केली याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)