मुस्लिम या देशात कायद्यात राहिले तर फायद्यात…धीरेंद्र शास्त्री महाराज नेमके काय म्हणाले?

हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आम्ही मुस्लिम विरोधी नाही. या देशाने एपीजे अब्दुल कलाम यांना स्वीकारले. तसेच इतरांनाही स्वीकरले. परंतु आज भयप्रद वातावरणामुळे पश्चिम बंगालमधून हिंदू पलायन करीत आहेत. उद्या महाराष्ट्रमध्ये करतील. पुढे मध्य प्रदेशमध्ये होईल. एका विशेष समुदायाकडून हिंदुना घाबरवण्याचे प्रयत्न येथील सरकारच्या मदतीने सुरू आहे, हे निंदनीय आहे. मुस्लिम या देशातील कायद्यात राहिले तर फायद्यात राहतील, असे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे.

देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीतील हायवे दिवे येथे तयार झाले.  श्री बागेश्वर मठाचे मठाधिपती पंडित धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आलेल्या श्री बागेश्वर बालाजी सनातन मठाचा लोकार्पण सोमवारी झाले. यावेळी धीरेंद्र शास्त्री बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वसाधारण गोरगरीब बागेश्वर बालाजी भक्तांना मध्यप्रदेश येथे जाणे शक्य होत नाही, अशा भक्तांसाठी भिवंडी येथील बागेश्वर बालाजी धाम ही पर्वणी आहे. हे मठ सनातन धर्म प्रसाराचे केंद्र व भक्तांसाठी आस्थेचे श्रद्धास्थान बनणार आहे, असे प्रतिपादन बागेश्वर बालाजी धामचे प्रमुख धोरेंद्र महाराज शास्त्री यांनी केले आहे.

असे आहे श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ

साडेचार एकर क्षेत्रफळावर मंदिराची रचना आहे. या ठिकाणी तळ मजला अधिक एक मजली आहे. मंदिराच्या पाठीमागच्या ठिकाणी यज्ञ शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर श्री बागेश्वर बालाजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बालाजींच्या उजव्या बाजूला गणरायाची मूर्ती आहे. डाव्या बाजूला सफेद स्फटीकाचे शिवलिंग आहे. तसेच बालाजींच्या मूर्तीच्या समोरच प्रभू श्रीरामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंत स्वारीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तळ मजल्यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे बैठक व्यवस्थेचे तसेच छोट्या खाणी दिव्य दरबार सभागृह बनवण्यात आले आहे. या ठिकाणी रामायणातील विविध प्रसंगाचे चित्र रेखाटून रामायण दाखवण्यात आले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)