गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवण्यासाठी नितीन गडकरींनी सांगितला ‘मेगा प्लॅन’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवण्यासाठी मेगा प्लॅन सांगितला. मुंबईत आयोजित कार्यक्रमात गडचिरोलीसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाचे सुरु असलेले उपक्रम गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले, गडचिरोली येथून एक रस्ता काढायचे आहे. जो थेट विशाखापट्टणम पोर्टला जोडला जाईल. रायपूर ते विशाखापट्टणम एक एक्सप्रेस बांधत आहोत. रस्ते झाले की त्या भागाचा विकास होतो. चित्र बदलते. दावोस येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसाठी गुंतवणूक आणली आहे. साडेसहा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या भागांत येत आहे. यामुळे जगातील सगळ्यात चांगले लोखंड या
ठिकाणी तयार होईल. या प्रकल्पात 80 टक्के स्थानिक मुलांना काम मिळावे, असे सांगितले असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलाबाबत नितीन गडकरी म्हणाले, या भागात असलेल्या नक्षलवाद्यांना मी देखील भेटलो होतो. त्यांची समजावले होते. त्यांना काम दिले. काम मिळाल्याने तीन हजार नक्षलवादी कामाला लागले. त्यांनी नक्षल अँक्टिव्हिटी त्यांनी सोडल्या. जल, जंगल यातून कसा विकास होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. मी राजकारण करतच नाही. 90 टक्के हेच समाजकारण करतो. गडचिरोलीला 500 विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बांधणार आहे.

29 वर्षांपूर्वी गडचिरोलीत असलेल्या नक्षलवादाची आठवण गडकरी यांनी सांगितले. गडचिरोली हे नक्षलवादी गाव म्हणून ओळखले जात होते. परिस्थिती अत्यंत बिकट होती. मी निवडणुकीसाठी तेथील एका भागात प्रचारासाठी गेली होतो. त्यावेळी पोलिसांनी मला घेरले. चहा पिण्यासाठी पण पोलिसांनी तंबू दिला नाही. परंतु आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आज या ठिकाणी 1200 शिक्षक आहेत. 30 हजार विद्यार्थी शिकत आहेत. आता 30 हजार विद्यार्थी संख्या 1 लाख करायची आहे, असा संकल्प गडकरी यांनी जाहीर केला.

आपल्या आवडत्या कामाबद्दल नितीन गडकरी यांनी प्रथम सांगितले. ते म्हणाले, देशात सुरु असलेली रस्ते , टनेल या गोष्टी प्रसिद्ध होतात. मात्र कृषी विभागात मला काम करायला आवडते. परंतु ते काम प्रसिद्ध होत नाहीत. मुंबई पुण्याची शक्ती वाढली तरी 65 टक्के जनता अजूनही खेड्यात आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायचे आहे. 29 वर्षांत आपण कोणाचा एकही रुपये कोणाचा घेतला नाही.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)