आता ED, CBI चौकशीचा… विद्यार्थी फोडा म्हणणाऱ्या गुलाबरावांना रोहित पवारांनी डिवचलं, म्हणाले…

Rohit Pawar on Gulabrao Patil : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने पक्षाचे लोक पोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडा, असे विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. याच विधानामुळे सध्या विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनीदेखील गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लबोल केला आहे.

मंत्री महोदय ED, CBI, IT च्या चौकशीचा…

रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी गुलाबराव पाटील यांची एक व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये गुलाबराव हे विद्यार्थी फोडा असा सल्ला देताना दिसतायत. यावरच रोहित पवार यांनी टीका केली आहे. “आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय ED, CBI, IT च्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटते आहे,” असं खोसच भाष्य रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

…तर शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील- रोहित पवार

तसेच, “मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील,” असा सल्लाही रोहित पवारांनी गुलाबराव पाटील यांनी दिलाय.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले होते?

गुलाबराव पाटील हे 12 एप्रिल रोजी एका कार्यक्रमात बोलत होते. भाषण करताना त्यांनी जिल्हा परिषदेतील विद्यार्थीसंख्या कमी असल्याचं सांगितलं. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांत विद्यार्थीसंख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र ही अपेक्षा व्यक्त करताना आम्ही ज्या पद्धतीने पक्षातील लोक फोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या याच विधानावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

सारवासारव करण्याचा केला  प्रयत्न

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या विधानानंतर सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. मी विनोदाने बोललो. आम्ही ज्या पद्धतीन पक्षातील कार्यकर्ते पक्षात घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या बाबतीत करावे, असे मला म्हणायचे होते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)