यावेळची हवा तशीच होती…लोकं म्हणायचे गुलाबराव गेले डब्ब्यात, पण… गुलाबराव पाटील निवडणुकीवर पहिल्यांदाच मनमोकळे बोलले

आपण निवडून येणार याची मलाही गॅरंटी नव्हती, पण लाडक्या बहिणीनी साथ दिल्याने आम्हाला मोठा आधार मिळाला आहे.सरकार देखील आता महिलांच्या पाठीशी उभे असून महिलांसाठी अनेक योजना सरकारने तयार केल्या आहेत. मला मंत्रीपद मिळेल की नाही याची देखील गॅरंटी नव्हती, पण सगळं झाले अशी तूफान फटकेबाजी गुलाबराव पाटील यांनी केली आहे. किनगाव -जळगाव या मार्गावरील रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

1500 रुपये पाहून आपलं बटण दाबलं

मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की खरं सांगायला गेलं तर यावेची हवाच तशी होती….मलाही वाटायचं की आता माझंही खरं नाही..लोकही म्हणायचे की माझे काय खरं नाही.पुन्हा मी येत नाही. गुलाबराव पाटील गेला डब्यात. पण लोकांनी छप्पर फाडके मत दिली आपल्याला आणि निवडून दिला आपल्याला. खरं म्हणायला गेलं तर महायुती यावेळी एवढी घट्ट होती.. की त्याचा परिणाम सर्वत्र पाहायला मिळाला. लाडकी बहीण जरी ती काँग्रेसची होती तरी तिने 1500 रुपये पाहून आपलं बटण दाबलं असेही त्यांनी सांगितले.

पण मी मंत्री झालो

यावेळची मतदानाची टक्केवारी जर बघितली तर महिलांनी आम्हाला खूप खूप मदत केली आहे. सरकार सुद्धा महिलांच्या पाठीशी उभे असून महिलांसाठी अनेक योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात तर 11 च्या 11 जागा या आपल्या निवडून आल्या आहेत. विरोधकांना बोहनीसुद्धा करता आलेली नाही. सांगायची गोष्ट झाली तर दोन्ही खासदार आपले. 11 चे11आमदार आपले. नशीब आपले बघा केंद्रात एक मंत्री आणि राज्यात तीन मंत्री आपले. तीन कॅबिनेट मंत्री एकाच वेळी आपल्या जळगाव जिल्ह्याला मिळाले आहेत. यावेळी मला मंत्रिपद मिळेल का नाही याची गॅरंटी नव्हती, कारण वाटा पाडणारे तीन आणि निवडून आलेले 237, पण मी मंत्री झालो असेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)