आंब्यापासून बनवा ‘हे’ 4 पेय, उन्हाळ्याची मजा होईल द्विगुणीत, जाणून घ्या रेसिपी

फळांचा राजा आंबा हा केवळ चवीचा खजिना नाही तर तो अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत देखील आहे. त्यात पोटॅशियम, प्रथिने, व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, लोह असे अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पिकलेला आंबा तुमची पचनक्रिया सुधारतो. हृदय निरोगी ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. वेगवेगळ्या घटकांपासून बनवलेले आंब्याचे पेय त्याची चव अनेक पटींनी वाढवते. या लेखात आपण आंब्यापासून बनवलेल्या पेयांच्या रेसिपी जाणून घेणार आहोत.

आंबा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ आहे. त्यातून अनेक प्रकारचे डेजर्ट्स आणि पेये देखील बनवली जातात. जर तुम्हीही आंब्याचे चाहते असाल तर या उन्हाळ्यात आंब्याचे हे पेय तुम्ही नक्कीच ट्राय करा.

मँगो शेक

उन्हाळ्यात आंब्याचा खाल्ला नसेल तर काय उपयोग? एक पिकलेला आंबा घ्या. आता आंब्याचा गर मिक्सरच्या
भांड्यात टाकुन त्यात थोडी साखर आणि दूध टाका. आता हे मिश्रण चांगले बारीक करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात थोडा बर्फ घाला आणि पुन्हा दोन वेळा मिश्रण चांगले ग्राइंड करा. आता तयार झालेला मँगो शेक एका ग्लासात काढा आणि त्यावर काजू आणि डायफ्रूटसने सजवा.

मँगो-कोकोनट मोजिटो

उन्हाळ्यात ताजेतवाने वाटणाऱ्यापेयांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही मँगो मोजिटो बनवू शकता. यासाठी आंब्याचे गर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता त्यात लिंबाचा रस मिक्स करा तसेच थोडे काळे मीठ आणि चिमूटभर काळी मिरी टाकून हे मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करा. आता एका ग्लासमध्ये वरील आंब्याचे मिश्रण टाकून त्यात नारळ पाणी आणि बर्फ टाकून हे मँगो-कोकोनट मोजिटो पिण्यास तयार आहे.

मँगो लस्सी अप्रतिम

आंब्याच्या लस्सीची चव अप्रतिम आहे. हे करण्यासाठी, आंब्याचा गर काढा आणि त्यात दही आणि साखर मिसळा. यानंतर, थोडी वेलची पावडर टाकुन त्यात चिरलेली बारीक केले डायफ्रुट्स टाका. आता ही मँगो लस्सी फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.

चविष्ट आंबा पुदिना पेय

आंब्याच्या बारीक फोडी करून त्यात पुदिन्याची पाने आणि थोडे मध टाकून मिश्रण बारीक करा. आता एका ग्लासमध्ये लिंबाचे तुकडे टाका आणि त्यात काळे मीठ टाकून चांगले मॅश करा. ग्लासमध्ये बर्फाचा तुकडा घाला. आता यात दोन चमचे किंवा तयार प्युरी टाका. चविष्ट आंबा पुदिना पेय प्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)