राऊतांच्या ‘बकऱ्या’ला शिंदेसेनेकडून ‘गाढवा’ने उत्तर, तुंबळ युद्धाचं कारण काय?

Sanjay Raut Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोघेही आता एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक झाले आहे. या दोन्ही नेत्यांच्या पक्षाचे नेतेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे तर नेहमीच शिंदे यांच्यावर टीका करतात. सध्या मात्र त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते चांगलेच भडकले आहेत. राऊत पोस्ट केलेल्या फोटोवर शिंदे यांच्या नेत्यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे.

राऊत यांनी नेमका कोणता फोटो पोस्ट केला?

संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत एक बकरा दाखवण्यात आला होता विशेष म्हणजे हा बकरा एका लाडकावर उभा होता. सोबतच ‘खबर पता चली क्या, ए सं शी गट…’ असं कॅप्शनही त्यांनी दिलं होतं. महाराष्ट्रत एक बकरा आहे. तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. त्या लाकडावरती या बकऱ्याला उभं केलेलं आहे. सोबतच फार शहाणपणा केलास तर मान उडवीन, असं या बकऱ्याला सांगितलेलं आहे. गप्प उभं राहायचं आणि बे-बे करत राहायचं, असं या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणतरी सांगितलं आहे, असंही राऊत म्हणाले होते. राऊतांनी अपलोड केलेल्या या फोटोवर नंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.

नरेश म्हस्के यांनी ट्विट केला गाढवाचा फोटो

राऊतांनी हा फोटो अपलेड करतातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी एका गाढवाचा फोटो अपलोड केला होता. एक उपहासात्मक कविताही अपलोड केली होती. ‘नवाच्या भोंग्याने संरारा दिली पुन्हा बांग, पुन्हा एकदा नको तिथे, घातलीस बघ टांग. मालकाने टाकलेलं खाऊन बें बें रोज सकाळी करायचं, जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखं बरळायचं. तुमची अक्कल आणि ताकद दिसली सगळ्यांना निवडणुकात, जनतेने भडकावली ना सणसणीत थोबाडात? आम्ही बकरे आहोत की वाघ ते ठरवलंय जनतेने, मला वाटतं जास्त भेकू नये गप्प बसावं गाढवाने…उबाठा ‘ असं नरेश म्हस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शिरसाट यांचीही संजय राऊतांवर टीका

यासह शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली. असे ट्विट करून राजकारण चालत नसते. संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहोत. तुम्ही मांजराच्या भूमिकेतही नाहीत. तुम्ही बिळात राहणारे उंदीर आहात. तुम्हाल याच उंदराच्या भूमिकेत राहावे लागणार आहे, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

दरम्यान, आता हा टिका-टिप्पणीचा वाद नेमका कुठपर्यंत जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)