तिकीट नही दिखाऊंगी, प्रधानमंत्री को ज्याके पुछ..विदर्भ एक्सप्रेसमध्ये विनातिकीट महिला प्रवाशाचा धुमाकुळ

विदर्भ एक्सप्रेसमध्ये धामणगाव रेल्वे स्थानकात चढलेल्या एका बुरखाधारी महिला प्रवाशाने तिकीटाशिवाय वातानुकूलित डब्यात गोंधळ घातल्याचे प्रकरण घडले आहे. 07 एप्रिल रोजी मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यात धामणगाव रेल्वे स्थानक येथून एक बुरखा धारी महिला विनातिकीट डब्यात चढली आणि दुसऱ्या प्रवाशाची बर्थ अडवून बसली. विदर्भ एक्सप्रेसने बडनेरा स्टेशन सोडल्यानंतर तिकीट तपासनीस आल्यानंतर सदर महिलेने त्यांच्यासोबत हुज्जत घातली. आणि आपले तिकीट दाखवले नाही. तसेच दुसऱ्याच्या बर्थवर जाऊन बसली. या महिलेला पकडण्यास रेल्वेकडे महिला पोलीस नसल्याने या महिलेने चांगलाच गैरफायदा घेतला. आणि तिकीट नही दिखाऊंगी, प्रधानमंत्री को ज्याके पुछ अशी उत्तर ही महिला बिनधास्त देऊ लागली.

“किसी ने मेरा मजाक उडाया तो एक एक को काट दूंगी..

7 एप्रिल रोजी मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यात धामणगाव रेल्वे स्थानकात एक बुरखाधारी महिला विनातिकीट जागा अडवून बसली. विदर्भ एक्सप्रेसने बडनेरा स्टेशन सोडल्यानंतर तिकीट तपासनीस आल्यानंतर या महिलेने त्याच्यासोबत चांगलीच हुज्जत घातली. “किसी ने मेरा मजाक उडाया तो एक एक को काटके रख दूंगी…!” अशी धमकी देत या महिलेने महिला शिपाई नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना खूपच छळळे आणि एकच धुमाकूळ घातला. धावत्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये महिला पोलीस कर्मचारी नसल्याने गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांनीं याची माहिती भुसावळ कंट्रोल रूमला दिली.

 दुसऱ्या डब्यात बसून पुढील प्रवासासाठी निघून गेली

भुसावळ कंट्रोल रूमने शेगाव पोलिसांना माहिती देताच विदर्भ एक्सप्रेस शेगाव येथे पोहोचल्यावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेला कसेतरी डब्यातून उतरवले. मात्र ही महिला तात्काळ दुसऱ्या डब्यात बसून पुढील प्रवासासाठी निघून गेली. याप्रकरणी शेगाव आरपीएफने या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा शोध आता शेगाव रेल्वे पोलीस घेत आहेत. या महिलेचा धुमाकूळ घालतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत शेगाव आरपीएफचे पोलीस निरीक्षक शांताराम हरणे यांना विचारणा केली असता त्यांनी या महिलेवर आम्ही कलम 145 B , 146 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा शोध घेत आहे , ही महिला आज हरियाणा या राज्यात ट्रेस झाली असल्याचेही त्यांनी सांगितलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)