साधव रहा, मुंबईत सर्वात मोठी लाट या तारखेला येणार, हे१ ८ दिवस उधाण वाऱ्याचे

मुंबईत उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की यंदाचा मे महिना आणखीन उष्ण असणार या भीतीने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे.या मुंबई आणि उपनगरात मुंबई महानगर पालिकेने रस्ते खोदून ठेवले असताना यंदा पावसाळा कसा जाणार याची भीती असतानाच आता मुंबईत जूननंतर १८ दिवस समुद्रावरील लांटाचे साम्राज्य असणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यंदा जुन महिन्यात सर्वात मोठी लाट येणार आहे. त्यामुळे यंदा पावसात समु्द्र किनाऱ्यांवर जरा जपनूच रहावे लागेल असे म्हटले जात आहे.

मुंबईकरांना एप्रिल महिना उजाडला की मुलांच्या शाळांच्या परीक्षा झाल्या की गावी जाण्याचे वेध लागलेले असतात. त्यानंतर मात्र मुंबईकर शेतकऱ्यांसारखीच चातकासारखी पावसाची वाट पाहात असतात. कारण या असह्य उकाड्यातू पाऊसच त्यांची सुटका करणार असतो. मुंबईकरांसाठी आता हवामान खात्याने १८ दिवस उधाणाचे असल्याचे जाहीर केले आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्रात उधाण येणार आहे समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे सूचना करण्यात आल्या आहेत.

२६ जून रोजी सर्वात मोठी लाट

यंदा १८ दिवस उधाणाचे असून या काळात समुद्रातील लाटा किती मीटर उंचीच्या असणार याची आकडेवारी जाहीर झाली आहे.या जून महिन्यात यंदा लाटांची उंची जास्त असणार आहे. समुद्रातील लाटा जास्त उंच असताना समुद्र किनारी कोणी जाऊ नये असे आवाहन केले आहे. मुंबईकर आणि पर्यटकांनी किनाऱ्यावर जाऊ नये असे आवाहन केले आहे. जून महिन्यात २६ जून रोजी  4.75 मीटरची लाट येणार आहे.

जूनमधील उधाणाचे दिवस दिनांक वेळ लाट उंची

24 स. 11.15 वा. 4.59 मीटर

25 दु.  12.05 वा. 4.71 मीटर

26 दु. 12.55 वा. 4.75 मीटर

27 दु. 13.40 वा. 4.73 मीटर

28 दु. 14.26 वा. 4.64 मीटर

जुलैमधील उधाणाचे दिवस

24 स. 11.57 वा. 4.57 मीटर

25 दु. 12.40 वा. 4.66 मीटर

26 दु. 13.20 वा. 4.67 मीटर

27 दु. 13.56 वा. 4.60 मीटर

ऑगस्टमधील उधाणाचे दिवस

10 दु. 12.47 वा. 4.50 मीटर

11 दु. 13.19 वा. 4.58 मीटर

12 दु. 13.52 वा. 4.58 मीटर

23 दु. 12.16 वा. 4.54 मीटर

24 दु. 12.48 वा. 4.53 मीटर

सप्टेंबरमधील उधाणाचे दिवस

8 दु. 12.10 वा. 4.57 मीटर

9 दु. 12.41 वा. 4.63 मीटर

10 दु. 1.15 वा. 4.59 मीटर

11 दु. 1.58 वा. 4.59 मीटर

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)