आपण प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात अनेक पौष्टिक व प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करत असतो. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. अशातच निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी 12 हे शरीरासाठी खूप महत्वाचे पोषक तत्व आहे. हे विशेषतः मज्जासंस्था, रक्तपेशी आणि डीएनए तयार करण्यासाठी कार्य करते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. यामध्ये अशक्तपणा, थकवा, मानसिक समस्या आणि स्नायू दुखणे यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं.
यावेळी पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता टाळण्यासाठी निरोगी आहाराचा समावेश करा. व्हिटॅमिन बी 12 चे बहुतेक स्रोत मांसाहारी पदार्थांमध्ये असते. पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही तुमच्या आहारात सुक्या मेव्यांचा समावेश करू शकता. दररोज सुक्या मेव्याचे पाणी प्यायल्याने शरीरात या जीवनसत्वाची कमतरता भासत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या सुक्या मेव्याचे पाणी प्यावे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बदाम, काजू, मनुका, अक्रोड आणि अंजीर रात्रभर भिजत ठेवावेत. सकाळी रिकाम्या पोटी या सुक्या मेव्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भासत नाही. यासाठी आहारात सुक्या मेव्याचे पाणी कसे समाविष्ट करावे ते जाणून घेऊया.
– सर्वप्रथम बदाम, काजू, मनुका, अक्रोड आणि अंजीर एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
– सकाळी हे भिजवलेले सुकामेवा पाण्यातून बाहेर काढा.
– आता हे पाणी चांगले गाळून घ्या.
– हे पाणी तुम्ही थोडे कोमट करून प्या आणि तुम्हाला हवे असल्यास चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात एक चमचा मध मिक्स करू शकता.
– दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो.
सुक्या मेव्याचे पाणी पिण्याचे फायदे
सुक्या मेव्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि रक्ताभिसरण देखील सुधारतात. सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे याच्या सेवनाने पचनाच्या समस्या देखील दुर होतात. त्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरात त्वरित ऊर्जा वाढवण्याचे काम करतात. त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सुका मेवा खाणे देखील खूप फायदेशीर मानले जाते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)