पुणे (आळंदी) : चला आळंदिला जाऊ ||ज्ञानदेवा डोळा पाहू||
होतील संताचीया भेटी || सुखाचिया सांगो गोष्टी ||
या ज्ञानेश्वर माऊलींच्या पंक्तीप्रमाणे, अलंकापुरीत आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या २९ जून रोजी पंढरपूरकडे माऊलींची पालखी रवाना होणार आहे. देशासह राज्यभरातून आळंदीत वारकरी दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदी नगरीत सुरू आहे. या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींचा चांदीचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुऱ्हाडे कुटुंबियांच्या हौश्या आणि बाजी या बैलजोडीला मिळाला आहे.कुऱ्हाडे कुटुंबंयांची ही तिसरी पिढी आहे, ज्यांना यंदाच्या पालखी सोहळ्या मान मिळाला आहे. यंदा बैलजोडीच्या मानासाठी आळंदी गावातील कुऱ्हाडे परिवाराकडून ७ अर्ज आले होते. त्यापैकी कुऱ्हाडे घराण्यातील सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्याकडील असणाऱ्या बैलजोडीला हा मान मिळाला आहे.
बाजी आणि हौश्या अशी या बैलजोडीचे नाव आहे. तब्बल २५ वर्षानंतर हा मान कुऱ्हाडे कुटूंबियांना मिळाला आहे. हा मान मिळाल्याने कुऱ्हाडे परिवारात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान ही बैलजोडी माऊलींच्या पालखी रथासोबत आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणार असून त्यासाठी नियमित बैलजोडीचा सराव देखील सुरू असल्याचं कुऱ्हाडे कुटुंबीयांनी म्हटलं आहे. ”यंदाच्या वर्षी आम्हाला हा मान मिळाल्याने जीवनाचे सार्थक झाले” असल्याचे सहादू कुऱ्हाडे यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी अलंकापुरीत वारकरी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाचा पालखी सोहळा उत्सहात होणार हे येणाऱ्या वारकऱ्यांवरून पाहायला मिळत आहे. कुऱ्हाडे कुटुबियांकडून बैलांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. कर्नाटक राज्यातून ही बैलजोडी आणली आहे. त्याची देखभाल देखील योग्य पद्धतीने केली जात आहे.