Maharashtra Breaking News LIVE 8 April 2025 : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील पालक दीड महिन्यापासून बेपत्ता; वकिलांच्याही संपर्काबाहेर

पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपाप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने प्राथमिक अहवालात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. रुग्णालयाकडून अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष समितीने या अहवालात काढला असून हा अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी उपचारास नकार दिल्याने ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर रुग्णालयानेही याप्रकरणी दहा लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे कॉमेडियन कुणाल कामराने ‘बुक माय शो’ला पत्र पाठवून यादीतून काढू नये (डिलीस्ट) किंवा आपला कार्यक्रम किती जणांनी पाहिला, किती उत्पन्न मिळालं याची माहिती द्यावी अशी मागणी केलीहोती. त्यावर “आम्ही केवळ तिकीट विक्रीसाठी माध्यम आहोत. कोणते कार्यक्रम यादीत ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजक घेतात”, असं उत्तर कंपनीकडून देण्यात आलं. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)