उपवास दरम्यान फक्त फळे, दुधी भोपळा आणि बटाटे यांसारख्या भाज्या आणि शिंगाड्याचे पीठ यासारख्या गोष्टींचा त्यांच्या आहारात समावेश करून त्या पदार्थांचे सेवन करतात. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये लोकं फक्त या गोष्टींपासून बनवलेले पदार्थ खातात. पण उपवासाच्या काळात व या कडक उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी पेय बनवू शकता आणि ते पिऊ शकता. कारण या पेयांच्या सेवनाने तुमच्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ही आरोग्यदायी पेय…
बनाना शेक
केळीचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, म्हणून अनेकजण उपवासाच्या वेळी केळीचे सेवन करतात. तुम्ही केळी खाण्याऐवजी याचा शेक बनवून देखील पिऊ शकता. बनाना शेक बनवण्यासाठी, प्रथम केळी सोलून त्याचे लहान तुकडे करा. मिक्सर जारमध्ये केळी, दूध, साखर किंवा मध घाला. शेक स्मूद आणि क्रिमी होईपर्यंत बारीक करा. जर तुम्हाला कोल्ड बनाना शेक आवडत असेल तर तुम्ही त्यात बर्फाचे तुकडे घालून मिक्सर मध्ये बारीक करू शकता. अशा पद्धतीने बनानाशेक तुम्ही प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळेल त्यासोबतच पोट देखील भरलेले राहील. मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी ते पिणे टाळावे. कारण त्यात नैसर्गिक साखर असते, जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते.
नारळ पाणी
नारळाचे पाणी शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्यास मदत करते कारण त्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. अशातच नारळ पाणी हे शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा प्रदान करण्यास देखील मदत करते. अशा परिस्थितीत तुम्ही उपवास करताना नारळ पाणी देखील पिऊ शकता.
फळांचा ज्यूस
उपवासाच्या वेळी तुम्ही फळांचा ज्यूस देखील पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि शरीर हायड्रेटेडही राहील. सफरचंदाचा ज्यूस, संत्र्याचा ज्यूस आणि अननस किंवा डाळिंबाचा ज्यूस देखील उपवासदरम्यान सेवन केले जाऊ शकतात.
लस्सी
उन्हाळ्यात अनेकांना लस्सी प्यायला खुप आवडते. कारण लस्सी शरीराला थंडावा देते. त्यासोबत पोटासाठी देखील फायदेशीर असून शरीराला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करते. म्हणून तुम्ही उपवासाच्या वेळी लस्सी देखील पिऊ शकता. हे तुमच्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यास देखील मदत करेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)