गिरीश महाजन यांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध, एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप!

जळगाव  : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर लपून राहिलेले नाही. या दोन्ही नेत्यांनी अनेकवेळा एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. हो दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे असतानाच खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला आहे. खडसे यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

“पत्रकार अनिल थत्ते यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात गंभीर आरोप केला आहे. त्यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असे म्हटलेले आहे. तसेच मला या आयएएस महिला अधिकाऱ्याचे नाव माहिती आहे. मात्र त्यांचे नाव मी घेणे उचित होणार नाही, असे या पत्रकाराने सांगितले, ” असेही खडसे यांनी म्हटले आहे.

अमित शाहांना कल्पना असल्याचा खसडेंचा दावा

तसेच “मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्याकडे बैठक झाली होती. या बैठकीवेळी अमित शाहा यांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं. त्यावेळी तुमचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत. दिवसभरातून 100 वेळी तुमचे तिथे कॉल्स झालेले आहेत. हे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत, असे अमित शाह यांनी महाजनांना सांगितले होते,” असा दावाही त्यांनी केला.

अमित शाहांनाही याबाबत विचारणार- खसडे

तसेच पुढे बोलताना, “त्यामुळे गिरीश महाजन यांचे गेल्या 10 वर्षांतील सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती पढे येईल. यामध्ये तथ्य काय आहे, ते समजेल. मी अमित शाहा साहेबांना बऱ्याचदा भेटतो. त्यामुळे आमची भेट झाली तर यात तथ्य काय आहे, हे अमित शाहा यांना विचारणार आहे. त्यांना भेटल्यानंतर चर्चेत एखाद्यावेळी विषय निघालाच तर तथ्य काय आहे? हे मी विचारणार आहे,” असेही खडसे यांनी म्हटलंय.

संजय शिरसाट यांनी केली महाजन यांची पाठराखण

गिरीश महाजन यांच्या याच आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपांची जंत्री संपली की, राजकारणात असे नवेनवे उद्योग काही लोक सुरू करतात. एकनाथ खडसे यांनी आरोप करायचे म्हणून केले आहेत. ज्या महिला अधिकाऱ्यासोबत संबंध जोडले जात आहेत, त्या अधिकाऱ्याने कुठे दावा दाखल केला आहे का? कुठे तक्रार केली आहे का? त्यामुळे थेट नरेटिव्ह सेट करण्यासाठी असा आरोप केला जात आहे. महिलाने तक्रार केली पाहिजे. तसं झालं तर सरकार योग्य दखल घेईल. अमित शाहा यांच्याकडे पुरावे असूनही गिरीश महाजन यांना मंत्रिपद कसं मिळू शकेल. सर्व बाबींची तपासणी करूनच आज गिरीश महाजन हे मंत्रिपदावर आहेत, अशी प्रतिक्रिया देत संजय शिरसाट यांनी खडसे यांनी गिरीश महाजनांवरील आरोप फेटाळले आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)