करुणा शर्माची ती दोन कागदपत्रे ठरली टर्निंग पॉइंट, धनंजय मुंडे यांना धक्का, पोटगी देण्याचा निर्णय कायम

Dhananjay Munde & Karuna Sharma: माझगाव सत्र न्यायालयातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे. करुणा शर्मा विरोधात दाखल करण्यात आलेली धनंजय मुंडे यांची याचिका न्यायालयाने शनिवारी फेटाळली. न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल देत कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय काम ठेवला. आता या निकालाविरोधात धनंजय मुंडे उच्च न्यायालयात जाऊ शकता. तसेच करुणा शर्मा पोटगी वाढवण्याची मागणी करु शकतात.

करुणा शर्माची कागदपत्रे ठरली महत्वाची

मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरणारा निकाल दिला होता. तसेच धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. त्या निकालाविरोधात माझगाव न्यायालयात धनंजय मुंडे यांनी धाव घेतली होती. परंतु त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना धक्का बसला. त्यासाठी करुणा शर्मा यांनी दाखल केलेली कागदपत्रे महत्वाची ठरली.

इच्छापत्र अन् स्वीकृतीपत्र

धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या तीन ते चार सुनावण्या झाल्या. त्यात शनिवारी करुणा शर्मा यांनी स्वत: युक्तीवाद केला. तसेच धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा पुरावा म्हणून दोन महत्वाचे कागदपत्रे दिली. त्यात धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र होते. स्वीकृती पत्रात माझ्या घराच्या दबावापोटी मी लग्न करत आहे. पण करुणा मुंडे यांचा सांभाळ करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. हे सर्व पुरावे तपासल्यानंतर वांद्रे कोर्टाचा निकाल माझगाव न्यायालयाने कायम ठेवला.

दरम्यान, कोर्टात धनंजय मुंडे यांनी मुलांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु करुणा शर्मा यांना पत्नी करण्यास नकार दिला होता. आता माझगाव न्यायालयाने पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. दोन लाख रुपये पोटगी करुणा शर्मा यांना मिळणार आहे. दरम्यान, आता करुणा शर्मा पोटगी वाढवून घेण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. तसेच धनंजय मुंडे या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)