चांदीचे दागिने काळे पडलेत? ‘या’ ट्रीक्स फॉलो करा अन् अवघ्या काही मिनिटात दागिन्यांना चकाकी आणा

चांदीचे दागिने आजकाल प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतात. विशेषतः लग्नसमारंभ किंवा अन्य सोहळ्यांमध्ये चांदीच्या दागिन्यांचा समावेश अनिवार्य मानला जातो. मात्र, काही काळानंतर चांदीच्या वस्तूंवर काळा थर चढण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते. अशा परिस्थितीत घरच्या घरी चांदीच्या दागिन्यांना पुन्हा चमक कशी आणता येईल, याबाबत काही सोप्या उपायांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1.रॉक मीठ आणि लिंबाच्या रस

एका भांड्यात एक कप पाणी आणि एक चमचा रॉक मीठ घ्या.

त्यात एक लिंबाचा रस टाका.

या मिश्रणाने जुन्या टूथब्रशच्या मदतीने चांदीच्या दागिन्यांवर किंवा भांड्यावर घासून घ्या.

ते स्वच्छ होईपर्यंत हलक्या हाताने घासून घ्या.

नंतर १० मिनिटे गरम पाण्यात भिजवा.

नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन चांगले कोरडे करा. चांदी नवीन सारखी चमकू लागेल.

2. फेस वॉश

एका भांड्यात गरम पाणी घ्या.

त्यात लिक्विड फेस वॉशचे काही थेंब टाका.

चांदीचे दागिने किंवा भांडी ५-१० मिनिटे त्यात बुडवा.

मऊ ब्रशने हळुवारपणे स्वच्छ करा.

शेवटी सुती कापडाने पुसून टाका.

3. टूथपेस्ट

यासाठी सर्वप्रथम टूथपेस्ट घ्या.

टूथपेस्ट कोलगेट असेल तर उत्तम.

चांदीच्या दागिन्यांवर किंवा भांड्यावर टूथपेस्ट लावा आणि घासून घ्या.

दागिने स्वच्छ करा, ते नवीनसारखे चमकतील.

या सोप्या टिप्सच्या मदतीने तुमचे चांदीचे दागिने आणि भांडी पुन्हा चमकदार होतील. घरच्या घरी केलेल्या या उपायांमुळे तुमच्या चांदीच्या वस्तू लवकरच नवीन सारख्या चमकू लागतील.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)