उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करणारा कॉमेडियन कुणाल कामराच्या माहीम इथल्या घरी सोमवारी मुंबई पोलिसांचं पथक गेलं होतं. पोलिसांनी कामराला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवलं होतं, पण तो अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे पोलीस पथक सोमवारी कामराच्या घरी पाहणी करण्यासाठी गेलं होतं. कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात चार गुन्हा दाखल आहेत. तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा आंदोलकांचे कान टोचले. संघाचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी कबरीचा मुद्दा अनावश्यकपणे उकरून काढला जात असल्याचं सांगत ज्यांची श्रद्धा असेल ते लोक औरंगजेबाच्या कबरीवर जातील, असं म्हटलं आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
Maharashtra Breaking News LIVE 1 April 2025 : मुंबईत घरं महागणार; राज्यातील रेडी रेकनर दरांमध्ये सरकारकडून वाढ
