संजय राऊत यांनी केलं मोठं विधानImage Credit source: TV9 Marathi
नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असं मोठी विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संघाची चर्चा बंद दाराआड असते. ती बाहेर येत नसते. तरीही काही संकेत असतात ते स्पष्ट आहेत. संघ ठरवेल पुढला नेता, तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणेल. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले राऊत ?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची एक भूमिका आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसतेय. ज्या अर्थी मोदींना 10-11 वर्षानंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही. इतक्या वर्षात गेले नाहीत. नड्डा यांनी संघाची गरज नाही अशी भाषा केली होती. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती मोदींचीच भूमिका असते. हे जेव्हा तुम्ही समजून घेता., तेव्हा मोदींना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे, असं राऊत म्हणाले.
ही बातमी अपडेट होत आहे.