Juicer Mixer Grinder for kitchen on flipkart these home appliances will make work easier
Image Credit source: tv9 marathi
उन्हाळ्याच्या कडक्यामुळे अनेकजण या दिवसात सर्वात जास्त प्रमाणात ज्यूसचे पित असतात. शरीराला थंडावा मिळावा यासाठी ज्यूसचे सेवन करत असतो. आपल्यापैकी असे अनेकजण आहेत जे घरात तयार केलेले ज्यूस पितात. आता अशातच तुम्ही सुद्धा तुमच्या स्वयंपाकघरासाठी 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन ज्युसर मिक्सर ग्राइंडर खरेदी करायचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या किंमतीच्या रेंजमध्ये उपलब्ध असलेले अनेक चांगले पर्याय सांगणार आहोत. तसेच तुमच्यासाठी या बजेटमध्ये Bajaj, Prestige, V Guard आणि Crompton सारख्या मोठ्या ब्रँड्सचे काही उत्तम मॉडेल्स शोधले आहेत जे तुमचे स्वयंपाकघरातील काम सोपे करण्यास मदत करतील. या कंपन्यांच्या ज्युसर मिक्सर ग्राइंडरची किंमत किती आहे आणि मिक्सर किती वर्षांची वॉरंटीसह येतात ते जाणून घेऊयात.
Surya Mixer Grinder
सूर्या कंपनीचा 500 वॅटचा मिक्सर ग्राइंडर अमेझॉनवर 3099 रुपयांना विकला जात आहे. पण तुम्ही हे प्रॉडक्ट 150 रुपयांच्या मासिक EMI वर देखील खरेदी करू शकतात.
PHILIPS Mixer Grinder
फिलिप्स कंपनीचा 500 वॅटचे मिक्सर ग्राइंडर फ्लिपकार्टवर 35% च्या सवलतीनंतर 2649 रुपयांना विकले जात आहे. कंपनी या मिक्सर ग्राइंडरची 2 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे ज्याचे रेटिंग 4.4 आहे.
Crompton Mixer Grinder
क्रॉम्प्टन कंपनीचे 650 वॅटचे मिक्सर ग्राइंडर फ्लिपकार्टवर 57% च्या सवलतीनंतर 2799 रुपयांना विकले जात आहे. ओव्हरलोड प्रोटेक्शनसह येणाऱ्या या मिक्सर ग्राइंडरला लोकांनी 5 पैकी 4.3 रेटिंग दिले आहे. कंपनी या मिक्सर ग्राइंडरची 24 महिन्यांची वॉरंटी आणि 30 महिन्यांची मोटर वॉरंटी देते. तुम्ही हे मशीन 99 रुपये प्रति महिना ईएमआय पर्यायाने (बीओबी कार्ड) देखील खरेदी करू शकता.
BAJAJ Juicer Mixer Grinder
बजाज कंपनीचा हा 500 वॅटचा मिक्सर ग्राइंडर 49% च्या सवलतीनंतर 2099 रुपयांना विकला जात आहे. लोकांनी या मिक्सर ग्राइंडरला 5 पैकी 4.2 रेटिंग दिले आहे. कंपनी या ग्राइंडरसोबत 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.
Prestige Plus Juicer Mixer Grinder
फ्लिपकार्टवर, तुम्हाला प्रेस्टीज प्लसचे हे 750 वॅटचे मिक्सर ग्राइंडर 52 % च्या सवलतीनंतर 2999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या मिक्सर ग्राइंडरला 4.2 रेटिंग असल्याने, तुम्हाला कंपनीकडून 2 वर्षांच्या वॉरंटीचा लाभ मिळेल. तुम्ही हे मशीन 106 रुपये प्रति महिना ईएमआय पर्यायासह (बँक ऑफ बडोदा कार्ड) खरेदी करू शकता.
लक्ष द्या
आम्ही वर नमूद केलेली उत्पादने खरेदी करण्याचा सल्ला देत नाही आहोत, ही बातमी फक्त माहितीसाठी आहे. लोकांचे रिव्ह्यु आणि फिडबॉक वाचल्यानंतर, तुम्हाला कोणता ज्युसर मिक्सर ग्राइंडर खरेदी करायचा आहे ते स्वतः ठरवा.