Natural Remedies: कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने होतील ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे

5 health benefits of applying chandan on forehead
Image Credit source: tv9 marathi

हिंदू धर्मात चंदनाचं अनन्यासाधारण महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. तसेच याच चंदनाचे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते, म्हणूनच आपण पाहतोच की सर्वाधिक ब्युटी प्रॉडक्टमध्ये चंदनाचा वापर केला जातो. त्यातच आपण पाहिलं असेल की लोकं कपाळावर चंदनाचा टिळा लावतात. कारण त्यामागचे अनेक स्वास्थ्याकारक फायदे आहेत. याकरिता तुम्ही सुद्धा कपाळावर चंदनाची पेस्ट लावू शकता, कारण त्यात अनेक एंजाइम आणि पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. चंदनाच्या वापराने तुमच्या पोटाशी संबंधित असलेल्या समस्या जसे की अतिसार, पोटदुखी इत्यादी दूर होतात. तसेच चंदनाचे तेल देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर आपण चंदनाच्या औषधी गुणधर्मांच्या प्रमाणाबद्दल बोललो तर ते चंदनाच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या प्रकारावर (पांढरे चंदन, लाल चंदन, पिवळे चंदन) अवलंबून असते.

चंदनाचा सुगंध एक आल्हाददायक अनुभूती देतो. त्याचे गुणधर्म सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. ते अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते. जसे की देवघरात सुगंधासाठी लोकं चंदनाचे तेल देखील वापरतात. पण अशातच कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने आरोग्याच्या कोणत्या समस्या दूर होऊ शकतात तसेच चंदन आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे , ते जाणून घेऊया.

उन्हाळ्यातील डोकेदुखीपासून आराम

चंदनामध्ये नैसर्गिक थंडावा असतो, म्हणून ते कपाळावर लावल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या डोकेदुखीपासून खूप आराम मिळतो आणि स्नायूंचा ताणही कमी होतो. चंदनाचा सुगंध मनाला शांत करतो आणि अस्वस्थता कमी करतो.

शरीराचे तापमान कमी होते

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराचे तापमान वाढण्याची समस्या खूप सामान्य आहे. अशातच या दिवसांमध्ये शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कपाळावर चंदनाचा लेप लावा. त्यासोबत तुम्हाला जर सामान्य ताप असला तरी, कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने खूप आराम मिळतो.

निद्रानाशातून आराम मिळतो

रात्रीच्या वेळी निद्रानाशाची समस्या असलेल्यांसाठी कपाळावर चंदनाचा लेप लावणे देखील फायदेशीर आहे. ज्यामुळे तुम्हाला अधिक सक्रिय आणि ताजेतवाने वाटते.

एकाग्रता वाढते

कपाळावर चंदनाचा लेप लावल्याने थंडावा मिळतो आणि तणावही कमी होतो, ज्यामुळे नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते आणि एकाग्रता वाढते. तसेच चंदनाचा सुगंधाने तुम्हाला आराम मिळतो.

मेंदूसाठी फायदेशीर

तुम्ही जेव्हा कपाळावर चंदन लावता तेव्हा ताण कमी होतो, निद्रानाश दूर होतो, एकाग्रता वाढते आणि त्याचा सुगंध मज्जासंस्थेलाही आराम देतो. त्याचे सुखदायक आणि दाहक-विरोधी गुणधर्म मेंदूचे एकूण आरोग्य सुधारते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)