‘अरे मला चक्कर येतीये, तुम्ही लोक…’; पोलीस आयुक्तालयात सतीश सालियन यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

दिशा सालियन प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनी हे प्रकरण चर्चेमध्ये आलं आहे. या प्रकरणात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे.

आज दिशा सालियनचे वडील सतीश सालिय यांनी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान भेटीनंतर परतत असताना प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘मला चक्कर येत आहे, तुम्ही लोक’ एवढंच ते यावेळी बोलले. एसआयटीनं स्टेटमेंट घेतलं होतं असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान आज सतीश सालियन यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली.  यावेळी त्यांनी नेमकी काय मागणी केली याबाबत सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी माहिती दिली आहे. ‘दिशाचे वडील सतीश सालियान यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परमबीर सिंग, सचिन वाझेलाही आरोपी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे, असं ओझा यांनी यावेळी म्हटलं.

वकिलाचे गंभीर आरोप 

दरम्यान या प्रकरणावर बोलताना सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी गंभीर आरोप केले आहेत.  “आदित्य ठाकरे खोटे बोलत आहे. आदित्य ठाकरेंचे गुन्हे लपवण्यासाठी ठाकरेंनी पदाचा वापर केला आहे. दिशा सालियानप्रकरणात उद्धव ठाकरेही आरोपी आहे. आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्यक्षदर्शीचे नाव सांगत नाही”, असा गंभीर आरोप या प्रकरणात निलेश ओझा यांनी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)