PMPML Bus : पीएमपीकडून मोफत बस पास उपलब्ध, कुणाला मिळणार लाभ? काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर पालिकेच्या शाळा येत्या आठ दिवसांत सुरू होत आहेत. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के अनुदानित पास योजन सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या शाळेतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील खासगी शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के अनुदानित मोफत बस प्रवास पास देण्यात येणार आहे. येत्या १२ जूनपासून या पाससाठी आवश्यक अर्जाचे वाटप सर्व आगारांमधून आणि पासकेंद्रावर करण्यात येणार आहे. भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील.

Mumbai Local: जायचे गोरेगावला, सिग्नल वाशीचा; हार्बर रेल्वेवर घोळ, गार्डच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
‘संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रितरीत्या घेऊन जाऊ शकतात. हे अर्ज भरून आगारात एकत्रित जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेला एकत्रित पास दिले जातील. महामंडळाने दिलेले सर्व पास शाळाप्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही,’ असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.