अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहानी होते. सकाळी चहा प्यायल्यामुळे दिवसभर ताजे आणि फ्रेश वाटते. चहाचे नियमितत सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण करते ज्यामुळे तुम्हाला निरोगी राहाण्यास मदत होते. आजकाल सोशल मीडियावर चहाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. चहाचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील. त्यामधील सर्वात जास्त व्हायरल झालेला म्हणजे गुलाबी चहा. गुलाबी चहा फक्त दिसायला नाही तर तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. अनेकजन गुलाबी चहाचा अस्वाद घेण्यासाठी महागड्या रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये जातात.
परंतु तुम्हाला माहिती आहे का? हा गुलाबी चहा तुम्ही घरच्या घरी गुलाबी चहा सोप्या पद्धतीनं रेडी करू शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीनं गुलाबी चहा कसा तयार केला पाहिजेल. गुलाबी चहा बनवण्यासाठी तुम्हाला ताज्या किंवा वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, पाणी, मध (पर्यायी) आणि हवे असल्यास, दालचिनी किंवा वेलचीचा एक छोटासा तुकडा आवश्यक आहे. सर्वप्रथम, जर तुम्ही ताज्या गुलाबाच्या पाकळ्या वापरत असाल तर त्या पूर्णपणे धुवा जेणेकरून घाण किंवा रसायने राहणार नाहीत. यानंतर, एका पॅनमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा.
उकळत्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि 5-10 मिनिटे उकळू द्या. यामुळे गुलाबाच्या पानांचा पूर्ण स्वाद पाण्यात येईल. आता चहा गाळून एका कपमध्ये ओता. यावेळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मध किंवा गोड पदार्थ घालू शकता. मध घातल्याने चहामध्ये नैसर्गिक गोडवा येतो. ज्यामुळे त्याची चव आणखी चांगली होते. तुम्हाला आवडत असल्यास, तुम्ही थोडी दालचिनी किंवा वेलचीचा तुकडा देखील घालू शकता, जेणेकरून चहाला अधिक ताजेपणा आणि सुगंध येईल. आता तुमचा गुलाबी चहा तयार आहे. या गरमागरम चहाचा आस्वाद घ्या आणि ताजेतवाने व्हा. गुलाबी चहा केवळ चविष्टच नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. गुलाबाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. ही चहा पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
गुलाबाच्या सुगंधामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते आणि चहाचे सेवन केल्याने तुमचे मन शांत राहते. याशिवाय, गुलाबी चहामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते. जे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. गुलाबी चहा वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. नियमितपणे गुलाबी चहाचे सेवन करून तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला चहा प्यायला आवडेल तेव्हा गुलाबी चहा नक्की वापरून पहा आणि त्याची चव आणि आरोग्य दोन्हीचा फायदा घ्या.