रोजच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव, चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक सामान्य समस्या प्रत्येकाला होत आहेत. कारण कामाचा ताण, वैयक्तिक जीवनातील समस्या, अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि वाढत्या डिजिटल एक्सपोजरमुळे अनेक लोकं मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटू लागतात. यातूनच बाहेर पडणे फार महत्वाचे आहे, कारण दीर्घकालीन चिंता आणि नैराश्य तुमच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करते.
चिंता आणि नैराश्यापासून मुक्त होण्यासाठी अनेकदा लोक औषधांचा वापर करतात, परंतु तुम्ही औषधांचा वापर करण्याऐवजी आयुर्वेद आणि नैसर्गिक उपाय देखील तुमची ही समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक उपायांबद्दल सांगत आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही नैसर्गिक पद्धतीने चिंता आणि नैराश्यातून बाहेर पडू शकता.
अश्वगंधा तणाव कमी करण्यास मदत करते
अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी तणाव संप्रेरक (कॉर्टिसॉल) नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच यांच्याने तुमचा मानसिक ताणही कमी होतो, मन शांत राहते आणि शरीरात ऊर्जा राखते. यासाठी तुम्ही सुद्धा तणावमुक्त होण्यासाठी अश्वगंधाची पावडर किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात खाऊ शकतात.
तुळस, एक नैसर्गिक अँटीडिप्रेसंट
तुळशीला एक उत्कृष्ट अनुकूलक मानले जाते, जे शरीराला तणावाचा सामना करण्यास मदत करते. तुम्ही जर तुळशीचे पान चावुन खाल्ले तर मेंदूचे कार्य सुधारते आणि मज्जासंस्था शांत करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावुन खा किंवा तुळशीचा पानांचा चहा करून प्या. हे तुमच्या मानसिक शांतीसाठी फायदेशीर आहे.
तूप आणि हळद यांचे सेवन
देशी तूप आणि हळदीचे मिश्रण यांचे सेवन केल्यास मेंदूला बळकटी मिळते आणि मूड सुधारते. करण तुपामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन हे दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असतात, जे मेंदूतील दाह कमी करून नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. तुम्ही दररोज एक चमचा तुपासोबत हळद मिक्स करून खाऊ शकता.
योग निद्रा करा
योग निद्रा ही एक खोल विश्रांती तंत्र आहे जी मनाला शांत करते आणि शरीरातील ताणतणाव दूर करते. दररोज 20-30 मिनिटे योगा निद्रा केल्याने चिंता आणि तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता देखील सुधारते.
आयुर्वेदिक मालिश करा
आयुर्वेदिक मालिश विशेषतः अभ्यंग मालिश, संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वाढवून मानसिक ताण कमी करते. आठवड्यातून दोनदा तीळाचे तेल, नारळाचे तेल किंवा अश्वगंधा तेलाने मालिश केल्याने मज्जासंस्थेला आराम मिळतो आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)