कुणी दंगा केला तर सोडणार नाही, नागपूरातील हिंसाचारप्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम, सदनात काय केले निवेदन

मुख्यमंत्र्यांचा दंगेखोरांना थेट इशारा Image Credit source: टीव्ही ९ मराठी

नागपूरमध्ये काल हिंसाचार उसळला. संध्याकाळी अचानक एक गट आक्रमक झाला. या गटाने एका परिसराला टार्गेट केले. त्यानंतर विरोधकांसह सरकारला धारेवर धरले. याप्रकरणात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगेखोरांना सज्जड दम भरला आहे. कुणी दंगा केला अथवा पोलिसांवर हल्ला केला तर तो कोणत्याही जाती, धर्माचा असला तरी त्याला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी असा सांगितला हिसेंचा घटनाक्रम

काल सकाळी 11. 30 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी औरंगजेब कबर हटाव यासाठी आंदोलन केले. जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्यात एक धार्मिक मेसेज लिहिलाय अशी अफ़वा पसरवण्यात आली. त्यानंतर ही हिंसेची घटना घडली.

बातमी अपडेट होत आहे…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)