आपल्याकडे कोणतेही शुभकार्य असल्यास तसेच सणवार असल्यास महिला आर्वजून साड्या परिधान करतात. कारण भारतात साड्यांचे आणि ती परिधान करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यातच तुम्हाला वेगळ्या शैलीतील साडयांमध्ये कांजीवरम्, बनारसी, पटोला अश्या अनेक प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. अशातच भारतात साड्यांचा स्वतःचा इतिहास आहे, जिथे प्रत्येक राज्याची स्वतःची खास साडी असते, जी त्या राज्याची संस्कृती आणि परंपरा प्रतिबिंबित करते. तर यापैकी एक म्हणजे मूंगा साडी, जी तिच्या अतुलनीय सौंदर्यासाठी, उत्तम कारागिरीसाठी आणि उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते. ही साडी परिधान केल्यावर जितकी हलकी आहे तितकीच ती जड दिसते. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच ही साडी खूप आवडते. जर तुम्ही सुद्धा साड्यांचे शौकीन असाल तर या मुंगा सिल्क साडीबद्दल जाणून घेऊयात…
मुंगा साडी ही आसामची एक अतिशय खास आणि प्राचीन वारसा असलेली साडी मानली जाते. ही साडी मुगा सिल्कपासून बनवली आहे, जी जगातील सर्वात अनोखी आणि टिकाऊ सिल्कपैकी एक आहे. तर ही साडी बनवण्यासाठी महिने लागतात. त्यात या साडीची खासियत म्हणजे ही साडी जितकी जुनी होत जाते तितकीच ती चमकदार दिसते. हेच कारण आहे की ही साडी पिढ्यानपिढ्या वारसा म्हणून चालवली जाते. चला तर मग जाणून घेऊया मुंगा साडीची खासियत, तिचा इतिहास आणि ती खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
मुंगा साडीचा इतिहास
आसाम राज्याची प्राचीन वारसा जपणारी मुंगा सिल्क साडीचा इतिहास खूप जुना आहे. त्यातच ही साडी बनवण्यासाठी लागणारे रेशीम विशेषतः आसाम राज्यात बनवले जाते. हे रेशीम फक्त आसाममध्ये आढळणाऱ्या अँथेरिया असामेन्सिस नावाच्या एका विशेष प्रकारच्या किड्यापासून तयार केले जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये आणि आसामच्या राजघराण्यातील पोशाखांमध्येही मुंगा रेशीमचा उल्लेख आढळतो. असे म्हटले जाते की प्राचीन काळात ही साडी फक्त राजघराणे आणि आसाममधील उच्चवर्गीय महिलाच परिधान करत असत, कारण ही साडी बनवण्याची प्रोसेस कॉम्प्लिकेटेड आणि वेळखाऊ होती. आसामचे राजे आणि राण्या ते शाही पोशाख म्हणून परिधान करायचे.
मुंगा साडीची वैशिष्ट्ये
- मूंगा साडीमध्ये असे अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ती इतर साड्यांपेक्षा वेगळी ठरते.
- नैसर्गिक सोनेरी चमक – मुंगा सिल्कची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे त्याला नैसर्गिक सोनेरी पिवळा रंग आहे, जो काळांतराने अधिकाधिक उजळत जातो. मुंगा सिल्क साडी बनवण्यासाठी लागणारे रेशीम इतर रेशीम कापडांपेक्षा जास्त चमकदार आहे आणि या साडीला रंगवण्याची आवश्यकता भासत नाही.
- मजबूत आणि टिकाऊ – मुंगा सिल्क हा जगातील सर्वात मजबूत नैसर्गिक फायबर मानला जातो. हे रेशीम इतके टिकाऊ आहे की या पासुन बनवलेल्या साड्यांची योग्य काळजी घेतल्यास ते पिढ्यानपिढ्या वापरता येते.
- आसामची पारंपारिक कलाकुसर- मुंगा साडीमध्ये आसामची पारंपारिक कलाकुसर दिसून येते. त्यामध्ये पारंपारिक हाताने विणलेल्या नक्षीकामांचा समावेश आहे, जे बहुतेक निसर्गापासून प्रेरित आहेत जसे की फुले, वेली, पक्षी आणि पारंपारिक भौमितिक डिझाइन.
- अत्यंत हलकी आणि आरामदायी – मुंगा सिल्क ही साडी जड दिसत असली तरी ती परिधान करायला खूप हलकी आणि आरामदायी आहे. हे रेशीम इतकं मऊ आहे की तुम्ही उन्हाळ्यातही देखील ही साडी सहजपणे परिधान करता येते.
- परंपरा आणि आधुनिक लूकचा परिपूर्ण मिलाफ – लग्न, पूजा, सण इत्यादी पारंपारिक प्रसंगी मुंगा साडी नेसली जाते. पण आजकाल, तसेच ही साडी मॉडर्न स्टाईलमध्येही कॅरी करता येते. अनेक सेलिब्रिटी आणि फॅशन डिझायनर्स मुंगा साडीला नवीन अंदाजात देखील सादर करत आहेत, ज्यामुळे ती तरुणांमध्येही खूप लोकप्रिय होत आहे.
मुंगा साडी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्हाला ओरिजिनल मुंगा साडी घ्यायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मूळ मुंगा साडीप्रमाणेच ती हस्तनिर्मित आहे आणि त्यात अतिशय उत्तम कारागिरी आहे. अस्सल मुंगा सिल्क साडीची किंमत 15,000 रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत असू शकते. तुम्हाला जर मुंगा साडी खूप कमी किमतीत मिळत असेल तर तिची गुणवत्ता नक्की तपासा. अस्सल मुंगा सिल्कचे रेशम त्याच्या नैसर्गिक सोनेरी चमकाने ओळखले जाते आणि हा रेशम तुम्ही जितका जास्त वापरला जातो तितकाच त्याची चमक वाढते.