संशयित आरोपी अहद शेख बनावट नोटा वापरात आणण्याासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख याला अटक केली. पोलिसांना झडती घेतली असता त्याच्याकडे ५० रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचे आढळून आले. यानंतर त्याने मिरजेत बनावट नोटांचा कारखानाच थाटल्याची बाब पोलिसांसमोर आली. पोलिसांनी लगेच धाड टाकत बनावट नोटा बनविणार्या कारखान्याचा पर्दाफाश केला.
विशेष म्हणजे हा कारखाना मिरज शहर पोलिस ठाण्याच्या काही अंतरावरच थाटण्यात आला होता. या कारखान्यातून पोलिसांनी ५० रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या १०० नोटांचे ३८ बंडल जप्त केले. तसेच अहद शेख हा २० आणि २० रुपयांच्या देखील जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा बनवत असल्याचे तपासात समोर आले आहे. नोटा बनविण्यासाठी वापरण्यात आलेले मशिन, कागद, लॅमीनेटर, नोटा कटींग करण्याठी वापरण्यात येणारे मशीन असे एकूण बनावट नोटांसह 3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना जप्त करण्यात यश आले.
अहद शेख हा ३० टक्के कमीशनवर नोटा व्यवहारात आणण्यासाठी अनेकांना देत होता अशी माहिती मिळत आहे. बनावट नोटा प्रकरणात अहद शेख याला कोणी कोणी मदत केलीय. त्याने कुठे-कुठे आणखी बनावट नोटाचे कारखाने टाकलेत किंवा किती बनावट नोटा कश्या आणि कुठे व्यवहरात आणली आहे का अशा सगळ्याच बाजूने सांगली शहर पोलिस तपास करीत आहेत.