महत्वाची बातमी, एसटी बंद पडल्यास कोणत्याही श्रेणीच्या बसमधून त्याच तिकीटावर प्रवास

एसटी प्रवास करताना काही वेळा तांत्रिक कारणाने बसेस बंद पडत असतात. अशा वेळी त्याच मार्गावरुन येणाऱ्या बसेसमधून प्रवास करण्याची मूभा असते. परंतू अनेकदा त्याच मार्गावर उच्च श्रेणीची बस आल्यास तिकीटाचा फरक वसुल केला जात होता. आता येथून पुढे बस वाटेत बंद झाल्यास, पुढील बस उच्च श्रेणीची असली तरी तिकीटाचा फरक आकारण्यात येणार नाही. त्याच तिकीटावर एसटीतून प्रवास करायला मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या एसटीतून प्रवास करताना काही तांत्रिक कारणाने बसेस वाटेत बंद पडण्याच्या घटना घडत असतात. अशा बसेसमधील प्रवासी त्याच मार्गावरुन येणाऱ्या दुसऱ्या बसची वाट पाहातात. काही वेळा तर साधी बस बंद पडली असली. आणि त्याच वेळी त्याच मार्गावर उच्च श्रेणीची पुढील बस आली तर प्रवाशांकडून तिकीटाचा फरक वसुल केला जात असे. मात्र, आता अशा प्रकारे फरक वसुल करु नये असे आदेश महामंडळाने जारी केले आहेत. त्यामुळे एसटीची साधी बस असली तरी ती बंद पडल्यास पुढील बस उच्च श्रेणीची असली तरी त्याच तिकीटावर प्रवास करता येणार आहे.

एसटी महामंडळाचे आदेश जारी

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही कारणाने बिघाडल्यास किंवा अपघात झाल्याने बंद पडल्यास प्रवाशांचा नाहक खोळंबा होत असतो. अशावेळी प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्याच मार्गावरील महामंडळाच्या पुढील बसणे प्रवास करण्याची अनुमती दिलेली आहे. परंतू ही बस उच्च श्रेणीची असली तरी आता त्यातून त्याच तिकीटात प्रवास करता येणार आहे. उच्च श्रेणीच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट भाड्याचा फरक वसुल करु नये असे आदेश एसटी महामंडळाने जारी केले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)