मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक काळात रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहे.

मध्य रेल्वे
स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – सकाळी ११.३० ते दुपारी ३.००

परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गारील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहे.

हार्बर रेल्वे
स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०


परिणाम – सीएसएमटी / वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप-डाउन लोकल रद्द राहणार आहे. सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगावदरम्यान धावणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
नेरळ-अमन लॉज मिनीट्रेन आजपासून बंद; अमन लॉज ते माथेरान फेऱ्या राहणार सुरु, असे आहे वेळापत्रक…
पश्चिम रेल्वे
स्थानक – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५

परिणाम – ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या वांद्रे आणि दादर स्थानकात रद्द करण्यात येणार असून त्याच स्थानकातून लोकलचा परतीचा प्रवास सुरू करण्यात येणार आहे.