प्रत्येक भारतीय कुटुंबात सकाळची सुरुवात चहाने होते. चहाचा एक घोट घेताच डोळ्यावरची झोप कुठल्या-कुठे उडून जाते. भारतात जसा सकाळी चहा घेतला जातो, तसाच तो सांयकाळच्या सुमारास देखील घेतला जातो. त्यामुळे दिवसभर आलेला थकवा, मरगळ दूर होते आणि आपण एका नव्या जोमानं पुन्हा कामाला सुरुवात करतो. चहाचा एक कप आपला सगळा थकवा दूर करतो. आपल्याला गरमागरम चांगला कडक चहा मिळावा अशी प्रत्येक चहाप्रेमीची इच्छा असते. त्यामुळे आपण अनेकदा चांगला चहा बनवण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो परफेक्ट बनू शकत नाही, त्यामध्ये कोणत्यातरी गोष्टीची कमी आहे, असं आपल्याला सतत जाणवत राहात. चहाच्या चवेवर सर्वात जास्त परिणाम करणारा घटक म्हणजे तुम्ही चहा बनवताना आधी पाणी टाकता की दूध टाकता हा आहे. त्यावरच चहाची चव अवलंबू असते. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
आधी दूध की पाणी?
चहा बनवताना अनेकांना हा प्रश्न पडतो की त्यामध्ये आधी दूध टाकायचं की पाणी? अनेकजण चहा बनवता आधी पाणी टाकतात ते उकळू देतात आणि नंतर त्यामध्ये दूध टाकतात. तर काही जण आधी दूध टाकतात त्यानंतर त्यामध्ये पाणी मिक्स करतात, मग त्याच्यामध्ये चहा, साखर मिक्स करतात. यातील योग्य पद्धत कोणती असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल, तर तुमची उत्सुकता आता अधिक न ताणता जाणून घेऊयात याचं उत्तर. तज्ज्ञांच्या मते चहाचा खरा स्वाद तेव्हाच येऊ शकतो जेव्ह चहा बनवताना आधी पाण्यात चहापावडर आणि साखर टाकून ते पाणी उकळून घ्यावे व नंतर त्यात दूध टाकावं. जर तुम्ही आधीच दूध टाकले तर चहा पावडर पाहिजे तेवढी उकळली जाणार नाही, तिचा आर्क चहामध्ये हवा तेवढा उतरणार नाही. त्यामुळे चहाची चव बिघडते.
असा बनवा परफेक्ट चहा
जर तुम्हालाही परफेक्ट चहा बनवायचा असेल तर खाली दिलेल्या गोष्टी फॉलो करा.
आधी एका पातेल्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये चहापावडर आणि साखर योग्य प्रमाणात टाका.
त्यानंतर हे मिश्रण चांगले उकळू द्या
त्यानंतर चहामध्ये दूध मिक्स करा, दूध टाकल्यानंतर बारीक गॅसवर हे मिश्रण पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटं उकळू द्या.
तुमचा चहा तयार होईल, आणि चव जराही कुठे बिघडणार नाही.